(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2021 | आयपीएलमधील बायो बबल म्हणजे काय?
स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायो बबल व्यवस्था करण्यात आली आहे. काही खेळाडूंच्या मते बायो बबल म्हणजे बिग बॉसचं घर. कारण या सिस्टममध्ये आल्यानंतर बाहेरील जगाशी खेळाडूंचा संपर्क राहत नाही.
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांचा क्रिकेट जगत तसच अंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून ही विरोध करणायात आला आहे. पण खरच आयपीएलमुळे देशात कोरोना संसर्ग वाढणार? खरचं आयपीएल बंद करण्याची गरज आहे? एबीपी माझाने या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी आयपीएलमध्ये वापरण्यात येणाऱ्या बायो बबल सिस्टमची माहती घेतली ज्याचा वापर केल्याने आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडूंपासून ते स्टाफ आणि इतर लोकांना कोरोनाची लागण होणार याची खबरदारी घेतली जाते.
काय आहे हे सिस्टम?
स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायो बबल व्यवस्था करण्यात आली आहे. काही खेळाडूंच्या मते बायो बबल म्हणजे बिग बॉसचं घर. कारण या सिस्टममध्ये आल्यानंतर बाहेरील जगाशी खेळाडूंचा संपर्क राहत नाही. फक्त टीम मेंबर आणि आयपीएलसाठी काम करणारे स्टाफ जे बायो बबलमध्ये आले आहेत. दुबईमध्ये झालेल्या आयपीएल नंतर यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना बायो बबल (जैव सुरक्षित) वातावरणामध्ये राहावे लागेल. यामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई चालणार नाही, अशा परिस्थितीत खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी संपर्क राहणार नाही.
आयपीएल कोरोनामुक्त राहावं यासाठी खेळाडूंचे जग हे हॉटेल, सरावाचे मैदान आणि आयपीएल लढती एवढ्यापुरतेच मर्यादित राहणार आहे. तसेच आयपीएलचे सामनेही रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्यात येतील. खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना बायो-बबलमध्ये ठेवण्यात येते. कोणताही व्हायरस खेळाडूंच्या जवळ येणार नाही, याची काळजी बायो-बबल घेत असते. आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचाऱ्यांची आयपीएल सुरु होण्याअधी दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकाला काही दिवस क्वारन्टीन ठेवलं. या काळात, तीन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच प्रत्येकास बबलमध्ये समाविष्ट केले गेले.
बबलमध्ये समाविष्ट असलेल्यांना फक्त मैदान आणि हॉटेलमध्येच राहण्याची परवानगी आहे. केवळ बबलच्या आत असलेलेच त्यांना भेटू शकतात. स्पर्धेदरम्यान चाहत्यांना मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नसते. संघातील सदस्यांसाठी आणि सामना प्रसारित करणार्या उर्वरित कर्मचार्यांसाठी स्वतंत्र बबल तयार करण्यात आला आहे. स्पर्धा संपेपर्यंत बबलमधील सर्व लोकांना बाहेर जाऊ दिले जात नाही. विशेष परिस्थितीत, बाहेर जाणाऱ्यांना बबलकडे परत जाण्यापूर्वी त्यांना क्वारन्टीन ठेवलं जात.
खेळाडूंच्यी संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाते. हॉटेल स्टाफ, हॉटेल आणि स्टेडियम मधील किचन स्टाफ, टीम बस ड्रायव्हर, स्टेडियम स्टाफ अश्या सर्व लोकांची कालमर्यादित कोरोना चाचणी केली जाती. बायो-बबलच्या नियंमांचे पालन करणे हे सर्वात महत्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडूने बायो-बबलच्या नियमांचे पालन केले नाही, तर त्याला संघाबरोबर राहता येत नाही. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात येते आणि ती चाचणी निगेटीव्ह आल्यावरच त्याला बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जातो. नियम मोडल्यास खेळाडूला कॉन्ट्रॅक्ट गमवावा लागू शकतो.
कोरोना काळामध्ये बायो बबल या व्यवस्थेकडे एक सकारात्मक समाधान म्हणून पाहिजे जात आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेमध्ये खेळाडूंसाठी बायो बबल व्यवस्था लागू करण्यात आली होती. मार्च 2020 मध्ये जागतिक लॉकडाऊनची सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले होते. त्यावेळी बायो सिक्योर फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. त्यालाच बायो बबल व्यवस्था म्हणतात.