एक्स्प्लोर

IPL 2020 : सूर्यकुमार-विराट, हार्दिक-सिराजमध्ये सामन्यादरम्यान बाचाबाची

IPL 2020 : मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला आहे. मुंबई कालच्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या सूर्यकुमार यादव आणि आरसीबीचा कप्तान विराट कोहलीमध्ये तसेच हार्दिक आणि सिराज यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.

IPL 2020 : मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला आहे. मुंबई कालच्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या सूर्यकुमार यादव आणि आरसीबीचा कप्तान विराट कोहलीमध्ये तसेच हार्दिक आणि सिराज यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. सामन्यादरम्यान हे खेळाडू एकमेकांशी बाचाबाची करताना दिसले.

मुंबईच्या 13 व्या षटकादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली  सूर्यकुमार यादव याच्या दिशेने आला. यावेळी दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली. षटक संपल्यानंतर विराट चेंडू घेऊन सूर्यकुमारकडे गेला. मात्र सूर्यकुमारनं शांत राहणं पसंत केलं. त्यानं मैदानावर टिकून राहत संघाला विजय मिळवून दिला. तर याच सामन्यात हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांच्यात देखील  बाचाबाची पाहायला मिळाली.

जेवलीस का? मॅचदरम्यान विराटचा अनुष्काला प्रश्न, व्हिडीओ व्हायरल

मुंबईकडून बंगलोरचा 5 विकेट्सने पराभव मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला. मुंबई विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. बंगलोरने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य मुंबईने 19.1 षटकात पूर्ण करत विजय नोंदवला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली. बंगलोरने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक 18 धावांवर बाद झाला. ईशान किशनला डावाची सुरुवात चांगली केली पण मोठा फटका खेळताना तो 25 धावांवर बाद झाला. सौरभ तिवारी आणि कृणाला पांड्याही स्वस्तात माघारी गेले. सौरव तिवारीने 5 तर कृणाल पांड्याने 10 धावा केल्या. एकीकडे एक एक फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकले. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर 79 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 17 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. बंगलोरकडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहलने प्रत्येक दोन तर ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली.

त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात दमदार झाली. जोश फिलिप आणि देवदत्त पड्डिकल यांनी पहिल्या विकेटसाठी 7.5 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. फिलिप 24 चेंडूत 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 14 चेंडूत केवळ 9 धावा करून बाद झाला. बुमराहने त्याला माघारी धाडलं. कोहलीनंतर एबी डिव्हिलियर्ससुद्धा 15 धावांवर बाद झाला.

डिव्हिलियर्सनंतर देवदत्त पड्डिकलही 74 धावांवर बाद झाला. पड्डिकलने यंदाच्या सीजनमधलं चौथं अर्धशतक झळकावलं. पड्डिकलनंतर शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात माघारी परतलं. डावाच्या शेवटी वॉशिंग्टन सुंदरने 6 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या आणि गुरकीरतसिंग मानने 11 चेंडूंत नाबाद 14 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने उत्तम गोलंदाजी करत चार षटकांत 14 धावा देत तीन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20I Live : श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
Hardik Pandya IPL News : MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO
MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO
Mumbai Ranji Trophy Squad : उपकर्णधार OUT, सूर्यकुमार यादवची एन्ट्री होणार?; 22 वर्षांचा खेळाडूही आघाडीवर, मुंबईच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष
उपकर्णधार OUT, सूर्यकुमार यादवची एन्ट्री होणार?; 22 वर्षांचा खेळाडूही आघाडीवर, मुंबईच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget