IPL 2020 : धडाकेबाज केएल राहुल! विराट, गेल, वॉर्नरच्या पंक्तीत, केला नवा विक्रम
IPL 2020 : किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करत नवा विक्रम केला आहे. आयपीएल 2020 च्या ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार असलेल्या राहुलनं आयपीएलच्या या मोसमात 600 धावा पूर्ण केल्या आहेत.
IPL 2020 : किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करत नवा विक्रम केला आहे. आयपीएल 2020 च्या ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार असलेल्या राहुलनं आयपीएलच्या या मोसमात 600 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने दोनदा आयपीएलमध्ये सहाशे धावांचा पल्ला पार केलाय. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. याआधी ही कामगिरी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनं केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीनं 2013 मध्ये 634 तर 2016 मध्ये धमाकेदार खेळीचं प्रदर्शन करताना तब्बल 973 धावा केल्या होत्या. राहुलं आतापर्यंत 41 सामन्यात 1893 धावा केल्या आहेत. त्यानं दोन शतकं आणि 17 अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएल 2018 मध्ये राहुलनं 659 तर आयपीएल 2019 मध्ये 593 धावा केल्या होत्या.
गेल-वॉर्नरनं तीनदा केलीय अशी कामगिरी क्रिस गेल आणि सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वार्नरनं आयपीएलमध्ये तीन वेळा एका मोसमात 600 धावा करण्याचा पराक्रम केलाय. क्रिस गेलने 2013 मध्ये 708, 2012 मध्ये 733 तर 2011 मध्ये 608 धावा केल्या होत्या. तर वॉर्नरनं 2019 मध्ये 692, 2017 मध्ये 641 तर 2016 मध्ये 848 धावा केल्या होत्या.
यंदाच्या ऑरेंज कॅपवर राहुलचा कब्जा आयपीएल 2020 मध्ये 600 पेक्षा अधिक धावा करुन केएल राहुलने ऑरेंज कॅपवर आपला दावा मजबूत केला आहे. राहुलनं या आयपीएलमध्ये 13 सामन्यात 58 च्या सरासरीने 641 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये दोन शतकं झळकावणारा शिखर धवन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शिखरनं 11 सामन्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकं झळकावत 471 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वार्नर आहे. त्यानं 436 धावा केल्या आहेत. रॉयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली 424 धावा केल्या आहेत तो चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या स्थानावर आरसीबीचा देवदत्त पडिक्कल आहे, त्याने 12 सामन्यात 417 धावा केल्या आहेत.