एक्स्प्लोर
आरसीबीचा पुन्हा एकदा धुव्वा, चेन्नईचा 6 विकेट्सने विजय
या विजयासह चेन्नईच्या खात्यात सर्वाधिक 14 गुणांची नोंद झाली आहे. रवींद्र जाडेजा आणि हरभजन सिंहचा फिरकी मारा चेन्नईच्या विजयात निर्णायक ठरला.

पुणे : चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. चेन्नईचा हा दहा सामन्यांमधला सातवा विजय ठरला.
या विजयासह चेन्नईच्या खात्यात सर्वाधिक 14 गुणांची नोंद झाली आहे. रवींद्र जाडेजा आणि हरभजन सिंहचा फिरकी मारा चेन्नईच्या विजयात निर्णायक ठरला. त्या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर चेन्नईने बंगलोरला नऊ बाद 127 असं स्वस्तात रोखलं होतं.
रवींद्र जाडेजाने 18 धावांत तीन आणि हरभजनने 22 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
चेन्नईने विजयासाठीचं 128 धावांचं लक्ष्य दोन षटकं आणि सहा विकेट्स राखून गाठलं. अंबाती रायुडूने 32, सुरेश रैनाने 25 आणि महेंद्रसिंग धोनीने नाबाद 31 धावांची खेळी उभारली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement


















