एक्स्प्लोर
रसेलचे 11 षटकार वाया, चेन्नईचा कोलकातावर थरारक विजय
चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा एक चेंडू आणि पाच विकेट्स राखून पराभव केला.
![रसेलचे 11 षटकार वाया, चेन्नईचा कोलकातावर थरारक विजय IPL 2018 : CSK beat KKR, another exciting finish for CSK रसेलचे 11 षटकार वाया, चेन्नईचा कोलकातावर थरारक विजय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/11091817/CSK.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजानं अखेरच्या फटकावलेल्या 19 धावांनी चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या रणांगणात सलग दुसरा सनसनाटी विजय मिळवून दिला. या सामन्यात चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा एक चेंडू आणि पाच विकेट्स राखून पराभव केला.
चेन्नईच्या या विजयाचा पाया सॅम बिलिंग्सनं रचला. त्यानं २३ चेंडूंत ५६ धावांची खेळी उभारली. मग चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना, ब्राव्हो आणि जाडेजानं कमाल केली.
त्याआधी, आंद्रे रसेलच्या खेळीनं कोलकात्याला सहा बाद २०२ धावांची मजल मारुन दिली होती. रसेलनं या सामन्यात षटकारांचा जणू पाऊस पडला. त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून 11 षटकार आणि एका चौकाराची वसुली केली. त्यामुळं त्याच्या नावावर ३६ चेंडूंत नाबाद ८८ धावांची खेळी उभी राहिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)