एक्स्प्लोर
स्फोटक फलंदाज ख्रिस लिनची आयपीएल मोहीम धोक्यात
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस लिनची आयपीएल मोहीम धोक्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध रविवारच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना लिनच्या खांद्याला पुन्हा दुखापत झाली आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीचा फलंदाज जोस बटलरचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात लिनच्या खांद्याला ही दुखापत झाली.
त्यानंतर कोलकात्याचे फिजियो अँड्र्यू लिपस त्याच्या दुखापतग्रस्त खांद्यावर उपचार करताना दिसले. लिनची ही दुखापत किती गंभीर याची सध्या ते चाचणी घेत आहेत.
पण आयपीएलच्या उर्वरित मोसमात तो खेळू शकला नाही, तर कोलकात्याच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब ठरावी.
लिननं गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात नाबाद 93 धावांची, तर मुंबई इंडियन्सविरुद्ध 32 धावांची खेळी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement