एक्स्प्लोर
ऋषभ पंतची वादळी खेळी; सचिन, बिग बीही भारावले

मुंबई : आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स यांच्यातीस सामन्यात अशी ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली, ज्याचं कौतुक करण्याचा मोह क्रिकेटच्या देवालाही आवरला नाही. दिल्लीच्या ऋषभ पंतने फक्त 43 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी करुन सगळ्याच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. षटकारांचा वर्षाव दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर ऋषभ पंतने आपल्या खेळीत षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. 97 धावांच्या खेळीत त्याने एकूण 9 षटकार आणि 6 चौकार ठोकले. तर त्याची साथ देणाऱ्या संजू सॅमसननेही 7 षटकांचा वर्षाव पाडला. त्याने 31 चेंडूत 61 धावा केल्या. दोघांनी मिळून 16 षटकार ठोकले, जो एक विक्रमच आहे. या सामन्यात एकूण 31 षटकारांचा वर्षाव झाला. दिल्लीच्या फलंदाजांनी 20 तर गुजरातच्या फलंदाजांनी 11 षटकार ठोकले.
सचिन तेंडुलकरही भारावला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही ऋषभ पंतची स्तुती करण्याचा मोह आवरला नाही. आयपीएलचे सर्व दहा मोसम जरी एकत्र केले तरी ही सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचं सचिन तेंडुलकर म्हणाला. https://twitter.com/sachin_rt/status/860192494692298755 महानायकही पंतचे फॅन "ऋषभ पंतची भन्नाट खेळी. 100 धावा न केल्याचं दु:ख नाही. आमच्यासाठी हे शतकापेक्षा जास्त आहे," असं अमिताभ बच्चन म्हणाले. https://twitter.com/SrBachchan/status/860206688313290753 209 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग गुजरात लायन्सने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचं डोंगराएवढी धावसंख्या उभारली आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सला 209 धावांचं लक्ष्य दिलं. दिल्लीचा कर्णधार करुण नायर लवकर बाद झाल्यानंतर पंत आणि संजू सॅमसनने शानदार फलंदाजी केली. दोघांनी 143 धावांची भागीदारी रचली. दिल्लीने हा सामना सात विकेट्सनी जिंकला. संबंधित बातम्या ऋषभ पंत वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन थेट मैदानात यंदाच्या आयपीएलमधला पहिला शतकवीर; दिल्लीचा संजू सॅमसन!
सचिन तेंडुलकरही भारावला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही ऋषभ पंतची स्तुती करण्याचा मोह आवरला नाही. आयपीएलचे सर्व दहा मोसम जरी एकत्र केले तरी ही सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचं सचिन तेंडुलकर म्हणाला. https://twitter.com/sachin_rt/status/860192494692298755 महानायकही पंतचे फॅन "ऋषभ पंतची भन्नाट खेळी. 100 धावा न केल्याचं दु:ख नाही. आमच्यासाठी हे शतकापेक्षा जास्त आहे," असं अमिताभ बच्चन म्हणाले. https://twitter.com/SrBachchan/status/860206688313290753 209 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग गुजरात लायन्सने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचं डोंगराएवढी धावसंख्या उभारली आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सला 209 धावांचं लक्ष्य दिलं. दिल्लीचा कर्णधार करुण नायर लवकर बाद झाल्यानंतर पंत आणि संजू सॅमसनने शानदार फलंदाजी केली. दोघांनी 143 धावांची भागीदारी रचली. दिल्लीने हा सामना सात विकेट्सनी जिंकला. संबंधित बातम्या ऋषभ पंत वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन थेट मैदानात यंदाच्या आयपीएलमधला पहिला शतकवीर; दिल्लीचा संजू सॅमसन! आणखी वाचा























