एक्स्प्लोर
सारसबाग v/s राणीची बाग, सोशल मीडियावर विनोदाचा पूर

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि पुणे हे दोन संघ एकमेकांना भिडत आहेत. मुंबई आणि पुणेकर एकमेकांना कायमच काँटे की टक्कर देताना पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच दोन्ही शहरांच्या अस्मिता जाग्या झाल्या आहेत. सोशल मीडियावर त्यानिमित्ताने विनोदाचा पाऊस पडताना दिसत आहे. मुंबई विरुद्ध पुणे सामन्याच्या निमित्त सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही विनोद : दगडूशेठ v/s सिद्धिविनायक सारसबाग v/s राणीची बाग मिसळपाव v/s वडापाव सुजाता मस्तानी v/s बादशाह फालुदा सांस्कृतिक राजधानी v/s आर्थिक राजधानी खडकवासला चौपाटी v/s गिरगाव चौपाटी दुर्वांकूर v/s आस्वाद सदाशिव पेठ v/s बीडीडी चाळ कोरेगाव पार्क v/s लोखंडवाला पुणेरी ढोल v/s कोंबडी बाजा फुरसुंगी v/s देवनार रानडे v/s कलिना तुळशीबाग v/s लिंकिंग रोड बाकरवडी v/s वडापाव दुपारी 1 ते 4 झोपणारं शहर v/s रात्री 1 ते 4 ही जागं असणारं शहर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























