एक्स्प्लोर
पंजाबचा RCB वर 8 विकेट्स राखून विजय

इंदूर: हाशिम अमलानं मनन वोहरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या साथीनं रचलेल्या भागिदाऱ्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. इंदूरच्या या आयपीएल सामन्यात बंगलोरनं पंजाबला विजयासाठी 149 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पंजाबनं ते आव्हान 33 चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं. हाशिम अमलानं पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं मनन वोहराच्या साथीनं सलामीला 62 धावांची आणि ग्लेन मॅक्सवेलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी रचली. किंग्स इलेव्हन पंजाबच्या विजयात हाशिम अमला आणि अक्षर पटेलनं मोलाची भूमिका बजावली. हाशिम अमलानं 38 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी उभारली. मनन वोहरानं 34 आणि ग्लेन मॅक्सवेलनं नाबाद 43 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. त्याआधी पंजाबचा डावखुरा स्पिनर अक्षर पटेलनं नवा चेंडू वापरताना चार षटकांत केवळ बारा धावा मोजून एक विकेट घेतली. अक्षर पटेलला या सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























