एक्स्प्लोर
INDvsAUS : टीम इंडियाचा 35 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलियानं मालिका 3-2 ने जिंकली
ऑस्ट्रेलियानं पाच वन डे सामन्यांची ही मालिका 3-2 अशी खिशात घातली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर 273 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 50 षटकांत 237 धावांत आटोपला.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे दिल्लीच्या निर्णायक वन डेत टीम इंडियाला 35 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं पाच वन डे सामन्यांची ही मालिका 3-2 अशी खिशात घातली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर 273 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 50 षटकांत 237 धावांत आटोपला.
केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारनं सातव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा जागवल्या होत्या. पण ते दोघंही लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झंपानं तीन तर पॅट कमिन्स, झे रिचर्डसन आणि मार्कस स्टॉयनिसनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी ऑस्ट्रेलियानं उस्मान ख्वाजाच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 272 धावांची मजल मारली. ख्वाजानं 10 चौकार आणि दोन षटकारांसह 100 धावांची खेळी केली. त्याचं या मालिकेतलं हे दुसरं शतक ठरलं. ख्वाजानं अॅरॉन फिंच आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बच्या साथीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. पीटर हॅन्ड्सकॉम्बनं 52 धावांची खेळी उभारली. तर फिंचनं 27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.That's a wrap!
— BCCI (@BCCI) March 13, 2019
Australia win by 35 runs and clinch the series 3-2 #INDvAUS pic.twitter.com/SyCAR2JwDM
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















