एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुसऱ्या डावात टीम इंडियाची घसरगुंडी, विजयासाठी २८७ धावांचं आव्हान
सेन्च्युरियन कसोटीत भारतीय संघासमोर विजयासाठी २८७ धावांचं आव्हान आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची तीन बाद २८ अशी घसरगुंडी उडाली आहे.
सेन्च्युरियन : विराट कोहलीची टीम इंडिया सेन्च्युरियन कसोटीत संकटात सापडली आहे. या कसोटीत भारतीय संघासमोर विजयासाठी २८७ धावांचं आव्हान आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची तीन बाद २८ अशी घसरगुंडी उडाली आहे.
भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांत गुंडाळला. पण पहिल्या डावातली २८ धावांची आघाडी जमेस धरता, दक्षिण आफ्रिकेची एकूण आघाडी २८६ धावांची झाली. याच आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवर मुरली विजय आणि केएल राहुल स्वस्तात माघारी परतले. तर पहिल्या डावात दीडशतक ठोकणारा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात अवघ्या 5 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत बरीच भर पडली आहे.
चौथ्या दिवसाअखेर भारतानं 3 गडी गमावून 35 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा आणि पार्थिव पटेल हे मैदानात आहेत. त्यामुळे आता शेवटच्या दिवशी भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement