एक्स्प्लोर
INDvsNZ : भारताचा न्यूझीलंडवर 53 धावांनी विजय
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा या सामन्यात खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणार आहे. त्यामुळं टीम इंडिया नेहराला विजयी निरोप देणार का, याकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली : सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माच्या फटकेबाजीनं दिल्लीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
- INDvsNZ : भारताचा न्यूझीलंडवर 53 धावांनी विजय
- INDvsNZ : न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत
- INDvsNZ : न्यूझीलंडला मोठा धक्का, कर्णधार केन विल्यमसन बाद
- INDvsNZ : न्यूझीलंडला पहिला धक्का, गप्टिल 4 धावांवर बाद, पांड्यानं टिपला अप्रतिम झेल
या सामन्यात न्यूझीलंडला नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीची पहिली संधी दिली. भारतीय सलामीवीरांनी या संधीचा पुरेपूर लाभ उठवला. या सामन्यात भारतानं 20 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 202 धावा केल्या. शिखर धवन आणि रोहित शर्मानं 80-80 धावा केल्या. तर कर्णधार कोहलीनं अवघ्या 11 चेंडूत 26 धावा फटकावल्या.
भारतीय फलंदाजांच्या या कामगिरीनंतर गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
- INDvsNZ : भारताचा तिसरा गडी बाद, रोहित शर्मा 80 धावांवर बाद
- INDvsNZ : भारताला सलग दोन धक्के, धवनपाठोपाठ पांड्याही तंबूत
- INDvsNZ : शिखर धवन 80 धावांवर बाद
- INDvsNZ : धवनपाठोपाठ रोहित शर्मानंही झळकावलं अर्धशतक, टीम इंडिया 137/0
- INDvsNZ : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात शिखर धवनचं अवघ्या 37 चेंडूत अर्धशतक
भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतला सलामीचा सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा या सामन्यात खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणार आहे. त्यामुळं टीम इंडिया नेहराला विजयी निरोप देणार का, याकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.
विराट कोहलीच्या टीम इंडियानं कानपूरच्या तिसऱ्या वन डेत न्यूझीलंडवर रोमांचक विजय मिळवत 2-1 अशी मालिका खिशात घातली आणि आता उभय संघ सज्ज तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.
भारतानं वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडवर विजय मिळवला असला तरी किवींशी ट्वेन्टी ट्वेन्टीच्य़ा लढाईत दोन हात करणं सोपं नाही. आजच्या घडीला न्यूझीलंडचा संघ हा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा राजा आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत केन विल्यमसनची टीम न्यूझीलंड अव्वल स्थानावर, तर विराट कोहलीची टीम इंडिया चक्क पाचव्या स्थानावर आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात भारताची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरीही विराट आणि त्याच्या शिलेदारांसाठी निश्चितच अभिमानास्पद नाही. भारताला गेल्या दहा वर्षात न्यूझीलंडवर एकाही ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
उभय संघांमधल्या पाचपैकी पाचही ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत सरशी ही न्यूझीलंडची झाली आहे. त्यामुळं आगामी मालिकेत नवा इतिहास घडवण्याच्या इराद्यानच टीम इंडियाला मैदानात उतरावं लागेल.
भारत आणि न्यूझीलंड संघांमधली ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजसारख्या नव्या दमाच्या शिलेदारांसाठी मोलाची ठरावी. 2019 सालच्या विश्वचषकाच्या दृष्टीनं टीम इंडियाची सध्या संघबांधणी सुरु आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या त्या प्रक्रियेमध्ये अढळपद मिळवायचं, तर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजला मिळेल त्या संधीचं सोनं करावं लागेल.
भारत-न्यूझीलंड संघांमधला सलामीचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरासाठी खास ठरावा. या सामन्यात खेळून नेहरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार आहे. दिल्लीचं फिरोजशाह कोटला स्टेडियम हे नेहराचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं या मैदानावर खेळून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची संधी बीसीसीआयनं दिली आहे.
आशिष नेहरानं आजवरच्या कारकीर्दीत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या कालावधीत त्याच्य़ा खात्यात 44 कसोटी, 157 वन डे आणि 34 ट्वेन्टी ट्वेन्टी विकेट्स जमा झाल्या आहेत. नेहराच्या गेल्या 18 वर्षांच्या कारकीर्दीला वारंवार दुखापतींचं ग्रहण लागलं होतं. त्यातून सावरण्यासाठी नेहराला तब्बल 12 शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं. पण प्रत्येकवेळी नेहरानं त्या दुखापतीतून आणि त्या शस्त्रक्रियेतूनही सावरून यशस्वी पुनरागमन केलं. आशिष नेहराच्या या जिद्दीला त्याच्या कारकीर्दीतल्या अखेरच्या सामन्यात सलाम ठोकायचा, तर टीम इंडियाला दिल्लीतील ट्वेन्टी ट्वेन्टीची लढाई जिंकावीच लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement