एक्स्प्लोर

#IndVsAus : इंदूर वनडे- नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी

विराट कोहलीच्या टीम इंडियाला तिसऱ्या वन डेसह पाच सामन्यांची मालिकाही खिशात घालण्यापासून रोखणं कठीण आहे.

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली तिसरी वन डे आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाला ही वन डे जिंकून पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्याची उत्तम संधी आहे. LIVE UPDATE : इंदूरमधील तिसरी वनडे- नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय कुलदीप यादवनं घेतलेली हॅटट्रिक कोलकात्याच्या वन डेमध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी निर्णायक ठरली. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारत दौऱ्यात मनगटी फिरकीला सामोरं जाताना प्रचंड दडपणाखाली आहेत, हे कुलदीपच्या या हॅटट्रिकनं ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा दाखवून दिलं. कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 253 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं 32 षटकांत 5 बाद 148 धावांची मजल मारली होती. पण 33 व्या षटकात कुलदीप यादवनं मॅथ्यू वेड, अॅश्टन अॅगर आणि पॅट कमिन्सला लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडलं आणि सामना भारताच्या बाजूनं झुकवला. कुलदीप यादवच्या हॅटट्रिकला दुसऱ्या एंडनं यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारकडून लाभलेली साथ कांगारुंना आणखी कोंडीत पकडणारी ठरली. एकंदरीत, चेन्नईपाठोपाठ कोलकात्याच्या वन डेतही भारतीय गोलंदाजांचं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर निर्विवाद वर्चस्व दिसून आलं. कुलदीप यादव... दोन सामन्यांमध्ये 87 धावांत पाच विकेट्स. सर्वोत्तम 54 धावांत तीन विकेट्स यजुवेंद्र चहल... दोन सामन्यांमध्ये 64 धावांत पाच विकेट्स. सर्वोत्तम 30 धावांत तीन विकेट्स. भुवनेश्वर कुमार... दोन सामन्यांमध्ये 34 धावांत चार विकेट्स. सर्वोत्तम नऊ धावांत तीन विकेट्स. हार्दिक पंड्या... दोन सामन्यांमध्ये 84 धावांत चार विकेट्स. सर्वोत्तम 28 धावांत दोन विकेट्स. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलची मनगटी फिरकी असेल किंवा भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याचा वेगवान मारा... पहिल्या दोन्ही वन डे सामन्यांमध्ये भारताचं आक्रमण हीच कांगारुंची मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे तिसऱ्या वन डेसाठी इंदूरच्या मैदानात उतरण्याआधी कांगारुंना या डोकेदुखीवरचा इलाज शोधावा लागणार आहे. अन्यथा विराट कोहलीच्या टीम इंडियाला तिसऱ्या वन डेसह पाच सामन्यांची मालिकाही खिशात घालण्यापासून रोखणं कठीण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India vs UAE : मोठी बातमी, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, गोलंदाजांची पुन्हा धुलाई, यूएईचा भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय 
टीम इंडियाचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, यूएईनं 26 बॉलमध्ये मॅच संपवली, भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय
Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी  
चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
Yuvraj Singh: अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
Embed widget