एक्स्प्लोर
बंगळुरु वन डेत ऑस्ट्रेलियाची भारतावर २१ धावांनी मात
ऑस्ट्रेलियानं भारतावर २१ धावांनी मात करून पाच सामन्यांच्या मालिकेतली आपली पिछाडी १-३ अशी भरून काढली.
![बंगळुरु वन डेत ऑस्ट्रेलियाची भारतावर २१ धावांनी मात India Vs Australia Live Cricket Score 4th Odi At Bengaluru बंगळुरु वन डेत ऑस्ट्रेलियाची भारतावर २१ धावांनी मात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/28074806/warnerfinch28091.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : टीम इंडियाची मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली विजयाची मालिका अखेर आज खंडीत झाली. बंगळुरुच्या चौथ्या वन डेत ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियानं भारतावर २१ धावांनी मात केली
पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत भारताने तीन विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियानं एक विजय मिळवला आहे.
अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मानं १०६ धावांची सलामी देऊन टीम इंडियाच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती. पण त्या दोघांपाठोपाठ विराट कोहलीही स्वस्तात माघारी परतला आणि भारतीय संघ संकटात सापडला.
केदार जाधवनं आधी हार्दिक पंड्या आणि मग मनीष पांडेच्या साथीनं प्रयत्नांची शर्थ केली. पण विजयासाठीचं धावांचं समीकरण वाढतच गेलं आणि ते गाठण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया अयशस्वी ठरली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय फिंच आणि वॉर्नरनं अगदी योग्य ठरवला. या दोन्ही सलामीवीरांनी २३१ धावांचा भक्कम पाया रचला. ज्या जोरावर कांगारूंनी ५० षटकांत पाच बाद ३३४ धावांचा डोंगर रचला. त्यात वॉर्नरचा वाटा १२ चौकार आणि चार षटकारांसह १२४ धावांचा होता.
कारकीर्दीतल्या शंभराव्या वन डेत शतक झळकावणारा तो जगातला आठवा फलंदाज ठरला. वॉर्नरचा सलामीचा साथीदार अॅरॉन फिन्चचं शतक सहा धावांनी हुकलं. त्यानं १० चौकार आणि तीन षटकारांसह ९४ धावांची खेळी केली.
या सामन्यासाठी टीम इंडियानं कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार या तीन प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली होती. त्या तिघांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय आक्रमणावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताकडून उमेश यादवनं ७१ धावांत चार फलंदाजांना माघारी धाडले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)