एक्स्प्लोर
Advertisement
Ind Vs Pak : विक्रम, स्टॅटिस्टिक्सशी देणंघेणं नाही : कोहली
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्यामुळे क्रिकेटचा ज्वर काहीसा वाढला आहे. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीने 'विक्रम रचणं किंवा स्टॅटिस्टिक्स याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. इट्स जस्ट अनदर गेम ऑफ क्रिकेट' म्हणत या सामन्याला विनाकारण महत्त्व न देण्याचं सांगितलं आहे. लंडनच्या ओव्हल मैदानात दोन्ही प्रतिस्पर्धी भिडणार आहेत.
4 जून रोजी झालेल्या ग्रुप सामन्यात पाकिस्तानला भारताने धूळ चारली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचं पारडं काहीसं जड मानलं जात आहे. 2013 मध्ये पटकावलेलं विजेतेपद टिकवण्याकडे टीम इंडियाचा कल राहील. कोहलीने मात्र मागील सामन्यांचा यावर कोणताही प्रभाव नसेल, दोन्ही संघांपैकी कोणीच खात्रीशीर विजेता नसेल, असं स्पष्ट केलं. शनिवारी लंडनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने टीम इंडियाच्या वतीने संवाद साधला.
'उद्याचा सामना हा कुठल्याही इतर सामन्याप्रमाणे असेल. आम्ही सामना जिंकण्यासाठीच खेळतो. सुरुवातीच्या सामन्याचा कोणताही संबंध मला दिसत नाही. चांगलं खेळणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. विक्रम रचणं किंवा स्टॅटिस्टिक्स याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. कोणताही संघ खात्रीशीर विजेता नाही. ज्यांच्याकडे उत्तम दृष्टी आहे, ती टीम जिंकेल.' असं कोहलीला वाटतं.
पाकिस्तानचा संघ कोणालाही हरवू शकतो. त्यांची क्षमता आणि कौशल्य याची जाण प्रत्येकालाच आहे, असं कोहलीला वाटतं. तुम्ही कसा विचार करता, यावर सगळं अवलंबून आहे, असंही कोहली म्हणाला. सकारात्मक विचार केल्यास तुमच्या खेळीवर सकारात्मक परिणाम होतो, असा कानमंत्रही कोहलीने दिला. प्रत्येक खेळाडू 120 टक्के कामगिरी बजावेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल कधी खेळवण्यात येईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल रविवारी 18 जूनला खेळवण्यात येईल.
भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल कुठे खेळवण्यात येईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल रविवारी 18 जूनला लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवण्यात येईल.
भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल कुठे पाहायला मिळेल?
भारत आणि पाकिस्तान यांचा अंतिम सामना स्टार स्पोर्स्ट 1, स्टार स्पोर्स्ट HD 1, स्टार स्पोर्स्ट 1 हिंदी, स्टार स्पोर्स्ट 1 HD हिंदी आणि DD नॅशनल अर्थात दूरदर्शनवर लाईव्ह मॅच पाहता येईल.
याशिवाय हॉट स्टार या मोबाईल अॅपवरही लाईव्ह मॅच पाहता येईल.
भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल मॅच किती वाजता सुरु होईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल लंडनच्या वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता, तर भारतात दुपारी 3 पासून पाहायला मिळेल.
भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल ऑनलाईन कुठे पाहता येईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल हॉटस्टार या मोबाईल अॅपवर पाहता येईल. तसंच लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषणासाठी www.abpmajha.in वर लॉग ऑन करा.
संबंधित बातम्या
IND vs PAK : महामुकाबल्यावर तब्बल 10 हजार कोटींचा सट्टा लागणार, बुकींची माहिती
IndvsPak Final CT 2017: फायनल कुठे, कधी, कशी पाहता येईल?
भारत की पाकिस्तान, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स कोण?
महामुकाबल्यात 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती?
'नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला टाक बाऊन्सर'
भारत नव्हे, आकडे बोलतात, पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार!
मोहम्मद आमिरचा मंदपणा, उत्साहाच्या भरात 'गेम प्लॅन' जाहीर
फिक्सिंग करुन पाकिस्तान फायनलमध्ये : आमीर सोहेल
पाकिस्तानवाल्यांनो तुम्ही जिंका, पण दहशतवाद थांबवा: ऋषी कपूर
'फादर्स डे'ला मुलासोबत फायनल, सेहवागचं हटके ट्विट
पाकिस्तानविरुद्धचा सामना इतर सामन्यांप्रमाणेच : विराट कोहली
8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली सर्वात वेगवान फलंदाज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement