एक्स्प्लोर

IND vs ENG 1st Test Day 3 highlights | तिसऱ्या दिवसअखेर सामन्यावर इंग्लंडचं वर्चस्व; भारतीय संघ अडखळला

चेन्नईमध्ये सुरु असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यावर पहिल्याच दिवसापासून इंग्लंडचं वर्चस्व पाहायला मिळालं.तिसऱ्या दिवशीही भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना हे चित्र बदलता आलं नाही

IND vs ENG 1st Test Day 3 highlights चेन्नईमध्ये सुरु असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यावर पहिल्याच दिवसापासून इंग्लंडचं वर्चस्व पाहायला मिळालं. तिसऱ्या दिवशीही भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना हे चित्र बदलता आलं नाही. इंग्लंडनं पहिल्या डावात उभ्या केलेल्या डोंगराएवढ्या मोठ्या धावसंख्येनंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाची खेळी काहीशी अडखळताना दिसली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाचे 6 खेळाडू तंबूत परतले होते.

आतापर्यंत भारतीय संघानं 257 धावा केल्या असून, इंग्लंडच्या धावांपासून संघ तब्बल 321 धावा मागे आहे. चौथ्या दिवशी फॉलोऑन टाळणं हेच भारतीय संघापुढचं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर 33 आणि अश्विन 8 धावा करुन खेळपट्टीवर टीकून होते.

... असा होता पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस

इंग्लंडच्या संघाने सर्वबाद 578 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय वाईट ठरली. सलामीवीर रोहित शर्मा जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर अवघ्या 6 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल यानं 28 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या आणि तोसुद्धा तंबूत परतला. आर्चरनंच त्याचाही विकेट घेतला. त्याच्यामागोमाग विराट कोहली अवघ्या 11 धावांवर झेलबाद झाला.

पुजारानं संयमी खेळी करत 143 चेंडूंमध्ये 73 धावा केल्या. या खेळीमध्ये त्यानं 11 चौकार लगावले. कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे त्याचं 29वं अर्धशतक ठरलं. पुजारा बाद झाल्यानंतर ऋषभ पंतनं संघाच्या धावसंख्येत 91 धावांचं योगदान देत परतीची वाट धरली. या खेळीत पंतनं 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचं पाचवं अर्धशतक ठरलं.

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची टीका

खेळपट्टीवर स्थिरावलेले हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विननं संघाची धुरा सांभाळली. सुंदरनं 68 चेंडूंवर 33 धावा केल्या तर, 54 चेंडूंचा सामना करणाऱ्या अश्विननं 8 धावा केल्या. ज्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळं चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजीचा डाव सावरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊसSupriya Sule Vs Atul Benke|माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, हिम्मत असेल तर.. सुळेंची बेनकेंवर टीकाMuddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Embed widget