एक्स्प्लोर
बंगळुरु कसोटी : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 126 धावांची आघाडी
बंगळुरु: चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या अभेद्य भागिदारीनं बंगळुरू कसोटीत टीम इंडियावरचं टेन्शन किंचित हलकं केलं. भारताकडे सध्या 126 धावांची आघाडी आहे. पण ही कसोटी रंगतदार करण्यासाठी भारताला अजूनही धावांची मोठी रास उभी करण्याची गरज आहे.
दरम्यान, या कसोटीत टीम इंडियानं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद 213 धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात घेतलेली 87 धावांची आघाडी लक्षात घेता भारताला चौथ्या दिवशी आणखी धावांची रास उभी करावी लागणार आहे.
टीम इंडियाच्या सुदैवानं चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अजूनही खेळत आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी चेतेश्वर पुजारा 79, तर अजिंक्य रहाणे 40 धावांवर होता.
------
LIVE: भारताचा चौथा गडी बाद, जाडेजा तंबूत
LIVE: भारताला तिसरा धक्का, कर्णधार विराट कोहली 15 धावांवर बाद
LIVE: अर्धशतक झळकावून सलामीवीर केएल राहुल बाद, भारत 92 /2
LIVE: भारताला पहिला धक्का, अभिनव मुकुंद 16 धावांवर बाद
बंगळुरु कसोटीत झुंजार फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 276 धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 87 धावांची आघाडी आहे. भारताकडून सर्वाधिक फिरकीपटू रवींद्र जाडेजानं 6 बळी घेतले. दरम्यान, भारतानं दुसऱ्या डावाला सावकाश सुरुवात केली आहे. लंचपर्यंत भारतानं एकही गडी न गमावता 38 धावा केल्या आहेत. केएल राहुल 21 धावांवर आणि अभिनव मुकुंद 16 धावांवर खेळत आहे.
दरम्यान, काल ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवसअखेर सहा बाद 237 धावांची मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी मॅथ्यू वेड 25, तर मिचेल स्टार्क 14 धावांवर खेळत होता. भारताच्या चारही गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी टिच्चून मारा केला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला दिवसभराच्या खेळात सहा विकेट्स गमावून केवळ 197 धावाच जमवता आल्या. त्यात मॅट रेनशॉ आणि शॉन मार्शच्या झुंजार अर्धशतकांचा मोलाचा वाटा होता.
रेनशॉनं 196 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची, तर शॉन मार्शनं 197 चेंडूंत चार चौकारांसह 66 धावांची खेळी उभारली. रेनशॉ आणि मार्शनं तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची, तर मार्श आणि मॅथ्यू वेडनं सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या डावाला मजबुती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement