एक्स्प्लोर
Advertisement
ICC Cricket World Cup : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने बनवले सहा विक्रम
सलामीवीर रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. रोहितने या सामन्यात सहा विक्रम स्वतःच्या नावावर केले.
लंडन : टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात केली. रोहितच्या शतकामुळे भारताने आफ्रिकेचे 228 धावांचे लक्ष्य पार केले.
काल झालेल्या सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतले 23 वे शतक ठोकले. रोहितने 144 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 122 धावा चोपल्या. या सामन्यात रोहितने तब्बल सहा विक्रम स्वतःच्या नावावर केले.
1. भारतातर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 22 शतकांचा विक्रम रोहितने काल मोडला. सचित तेंडुलकर (49 शतके) आणि कर्णधार विराट कोहली (41 शतके) या दोघांनंतर रोहितचा तिसरा क्रमांक आहे.
2. रोहितने 128 चेंडूत शतक पूर्ण केले. 'हिटमॅन' रोहित वेगवान धावा करणारा फलंदाज आहे. परंतु कालच्या सामन्यातले शतक हे रोहितच्या कारकिर्दीतले सर्वात धिम्या गतीने केलेले शतक ठरले आहे.
3. रोहितचे शतक हे विश्वचषक स्पर्धेतले भारतीय खेळाडूने केलेले 26 वे शतक ठरले आहे. या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 26 शतकांशी बरोबरी केली आहे.
4. 12 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा 9 भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत अनुक्रमे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, एमएस धोनी, विरेंद्र सहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आहे. 5. विराटची 122 ही धावसंख्या विश्वचषक स्पर्धेतली कोणत्याही भारतीय खेळाडूची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरने 127 धावा केल्या होत्या. 6. विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना रोहितने केलेले हे शतक भारतीय फलंदाजांने केलेले चौथे शतक ठरले आहे.1️⃣ 2️⃣ 2️⃣ runs 1️⃣ 4️⃣ 4️⃣ balls 1️⃣ 3️⃣ fours 2️⃣ sixes
The Hitman was on 🔥 and no wonder he was our @oppo Shotmaker of the Day! pic.twitter.com/yN0lFosHhW — ICC (@ICC) June 6, 2019
The one and only Hitman is Player of the Match for his match-winning 122* 👏👏😎🇮🇳🇮🇳 #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/IanTFhajHN
— BCCI (@BCCI) June 5, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement