Mohammed Shami : आधी टीम अन् आता रडीचा डाव मांडलेला पाकिस्तानी मीडिया; मोहम्मद शमीने पार शेलक्या शब्दात लाज काढली
पाकिस्तानी मीडियामध्ये अशी चर्चा आहे की विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाच्या गोलंदाजांना झोडपले जात आहे, परंतु भारतीय वेगवान गोलंदाजांनी कहर केला आहे कारण भारत गोलंदाजी करत असताना चेंडू बदलला आहे.
Mohammed Shami on Pakistan :टीम इंडिया 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये धुमाकूळ घालत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने फक्त जिंकले नाहीत, तर विरोधी संघांना एकतर्फी पराभूत केले आहे. टीम इंडियाचे फलंदाज केवळ कहरच करत नाहीत तर गोलंदाजही कहर करत आहेत. त्यामुळे जळफळाट सुरु असलेल्या पाकिस्तानी मीडियामध्ये टीम इंडियावर फसवणूक केल्याचा आरोपही केला जात आहे.
थोडी लाज वाटू द्या, खेळावर लक्ष केंद्रित करा, मूर्खपणावर नाही
पाकिस्तानी मीडियामध्ये अशी चर्चा आहे की 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाच्या गोलंदाजांना झोडपले जात आहे, परंतु भारतीय वेगवान गोलंदाजांनी कहर केला आहे कारण भारत गोलंदाजी करत असताना चेंडू बदलला आहे. आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या आरोपांवर जोरदार प्रहार केला आहे.
Mohammed Shami giving reply to Pakistani experts. pic.twitter.com/xwgsY31rU9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023
या आरोपांना निरर्थक ठरवत मोहम्मद शमीने त्याच्या इन्स्टा स्टोरीमधून सर्जिकल स्ट्राईक केला. 'थोडी लाज वाटू द्या, खेळावर लक्ष केंद्रित करा, मूर्खपणावर नाही. इतरांच्या यशाचा कधीतरी आनंद घ्या. शिट यार, हा आयसीसी विश्वचषक आहे, तुमची स्थानिक स्पर्धा नाही आणि शेवटी तू एक खेळाडू आहेस.
शमीने पुढे लिहिले की, 'वसिम भाईने (पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज वसिम आक्रम) खुलासा केला आहे. तुमचा खेळाडू वसीम अक्रमवर विश्वास नाही. साहेब स्वतःची स्तुती करण्यात मग्न आहेत. तुम्हाला फक्त लाईक आणि व्वा. शमीने अनेक ठिकाणी हसणारे इमोजी देखील वापरले आहेत.
पाकिस्तानी मीडियात काय चर्चा?
पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर बीसीसीआयवर आरोप केले जात आहेत. असे म्हटले जात आहे की, भारतीय खेळपट्ट्यांवर सर्वोत्तम विदेशी गोलंदाजांची धुलाई होत आहे. पण भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी का करत आहेत? भारतीय सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची पाळी आली की चेंडू बदलला जातो. अधिक स्विंग आणि सीम उपलब्ध आहे. कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या बॉलची रचना केली गेली असेल. यामुळेच जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज तिथे अपयशी ठरत आहेत पण भारताचा प्रत्येक वेगवान गोलंदाज भरपूर विकेट घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या