एक्स्प्लोर
Advertisement
ICC World Cup 2019 : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात कोणाचं पारडं जड?
विश्वचषकाच्या रणांगणात विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आज (शनिवारी) अफगाणिस्तानशी मुकाबला आहे. हा सामना साऊदम्पटनमध्ये खेळवण्यात येत आहे.
लंडन : विश्वचषकाच्या रणांगणात विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आज (शनिवारी) अफगाणिस्तानशी मुकाबला आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाचा विश्वचषकातला हा पाचवा सामना असून टीम इंडियाने तीन सामन्यांमध्ये बजावलेली कामगिरी लक्षात घेता, या सामन्यावर विराटसेनेचेच निर्विवाद वर्चस्व अपेक्षित आहे.
इंग्लंडमधल्या विश्वचषकातल्या मातब्बर संघांवर मात केल्यानंतर आता टीम इंडियाची गाठ पडणार आहे ती दुबळ्या अफगाणिस्तानशी. साऊथम्प्टनच्या रोझ बाऊल स्टेडियमवर टीम इंडिया गुणतालिकेतले आपलं स्थान आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
टीम इंडियाचा विश्वचषकातला अफगाणिस्तानविरुद्धचा हा पेपर तुलनेत सोपा आहे. कारण गुलबदीन नाइबच्या अफगाणिस्तान संघाला गेल्या पाचही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर टीम इंडियाने चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द करण्यात आला होता.
वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि अफगाणिस्तान दोनदा आमनेसामने आले आहेत. त्यातला एक सामना भारताने जिंकला आहे तर एक सामना टाय झाला आहे.
साऊथम्प्टनमधल्या या सामन्यात भारताचेच पारडं जड आहे. परंतु भारतीय संघव्यवस्थापनाला मात्र सध्या वेगळीच समस्या भेडसावत आहे. ती म्हणजे खेळाडूंच्या दुखापतीची. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवनला आधीच विश्वचषकातून मुकावे लागले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारलाही दुखापतीने ग्रासलं. त्यानंतर साऊथम्प्टनमध्ये सरावादरम्यान जसप्रीत बुमराहच्या यॉर्करनं विजय शंकरच्या तळपायाचा वेध घेतला. आणि टीम इंडियाच्या चिंतेत आणखी भर पडली.
टीम इंडियाविरुद्ध सामन्यात आपण फिरकीची जादू पुन्हा दाखवू, अफगाणिस्तानचा स्पिनर रशिद खानचा विश्वास | ABP Majha
दुखापतींच्या या पार्श्वभूमीवर विराट कोहली आणि त्याचे शिलेदार अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धची ही लढत टीम इंडियासाठी बेंच स्ट्रेंथ पारखण्यासाठीची मोठी संधी आहे. मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक यांनी चारपैकी एकही सामना खेळलेला नाही. तर शिखर धवनऐवजी संघात दाखल झालेल्या रिषभ पंतलाही या सामन्यात संधी मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
राऊंड रॉबिन फॉरमॅटनुसार खेळवण्यात येत असलेल्या सध्याच्या विश्वचषकात अव्वल चार संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे साऊथम्प्टनमध्ये अफगाणिस्तानवर मात करुन टॉप फोरमधले स्थान बळकट करण्याची टीम इंडियाला चांगली संधी आहे. विराट आणि त्याचे शिलेदार या संधीचा कसा फायदा उठवणार हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement