एक्स्प्लोर
'मला कपिल देव व्हायचं नाही, हार्दिक पंड्याचं राहू द्या'
पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीनंतर पुन्हा एकदा त्याची तुलना भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्याशी होत आहे.
लंडन: इंग्लंडविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटीचा दुसरा दिवस टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने गाजवला. पंड्याने 5 विकेट घेत इंग्लंड फलंदाजीचं कंबरडं मोडलं.
पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीनंतर पुन्हा एकदा त्याची तुलना भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्याशी होत आहे. यापूर्वीही अनेकवेळा पंड्याची तुलना कपिल देव यांच्याशी झाली होती. त्यावेळी माजी कसोटीवीर सुनील गावसकर यांनी तुलना करणाऱ्यांना झापलं होतं. त्यानंतर आता स्वत: पंड्याने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पंड्या म्हणाला, “मी हार्दिक पंड्या म्हणूनच खूश आहे. माझी तुलना कपिल देव यांच्याशी करु नये. मी आजपर्यंत 40 वन डे आणि 10 कसोटी सामने खेळलो. हे सर्व मी कपिल देव म्हणून नव्हे तर हार्दिक पंड्या बनूनच मिळवलं”
एकवेळ तुलना ठिक आहे. मात्र जेव्हा काही चुकीचं होतं, तेव्हा हा कपिलसारखा नाही असं म्हटलं जातं, असंही पंड्याने नमूद केलं.
कपिल देव यांचा काळ वेगळा होता. माझी त्यांच्याशी तुलना नको. मला हार्दिक पंड्याच राहू द्या. माझी कोणाशीच तुलना करु नका, त्यातच मला आनंद आहे, असं हार्दिक पंड्या म्हणाला.
मला कपिल देव व्हायचं नाही. क्रिकेटजगत मला हार्दिक पंड्याच्याच नावाने ओळखावं, अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
पंड्याच्या पाच विकेट
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाच विकेट घेत इंग्लंडच्या डावाचं कंबरडं मोडलं. पंड्याच्या पाच, इशांत शर्मा आणि बुमरा यांच्या प्रत्येकी दोन विकेटमुळे इंग्लंडचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 168 धावांची आघाडी मिळाली.
कसोटीवर भारताची पकड
विराट कोहलीच्या टीम इंडियाने नाटिंगहॅम कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 168 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद 124 धावांची मजल मारली. भारताकडे एकूण 292 धावांची आघाडी झाली आहे. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी सलामीच्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. धवनने 44 धावांचं योगदान दिलं. लोकेश राहुलने 36 धावांची खेळी उभारली. त्यामुळे भारताची एकूण आघाडी आता 292 इतकी झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 33, तर कर्णधार विराट कोहली आठ धावांवर खेळत होते.
संबंधित बातम्या
नॉटिंगहॅम कसोटी : दुसरा दिवस पंड्याने गाजवला, भारत मजबूत स्थितीत
एकाच डावात पाच झेल, पदार्पणाच्या सामन्यातच ऋषभ पंतचा विक्रम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement