Hardik Pandya : मुंबईतील हार्दिक 'स्वागता'चा आजच कंडका पडणार? गुजरातने किती कोटीला 'सेनापती' सोडला; बदल्यात काय??
Hardik Pandya : गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिकच्या मुंबईतील घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचं काय झालं हे आजच (25 नोव्हेंबर) किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
Hardik Pandya : उद्या 26 नोव्हेंबर म्हणजेच IPL 2024 साठी खूप खास आहे. कारण सर्व 10 फ्रँचायझींच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली जाईल. यासह ट्रेड विंडो देखील संपुष्टात येईल. अशा स्थितीत पुढील 24 तासांत काही मोठे व्यवहार आणि अदलाबदली दिसू शकतात. आतापर्यंत फक्त तीन खेळाडूंची बदली झाली आहे आणि हार्दिक पांड्याचे चौथे नाव पुढे केले जात आहे, ज्यावर अधिकृत कोणीही भाष्य केलेलं नाही.
The official announcement on Hardik Pandya is likely to come by this evening or tomorrow. (Cricbuzz). pic.twitter.com/1D2nDgLfVP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 25, 2023
आजच फायनल निर्णय होण्याची शक्यता
गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिकच्या मुंबईतील घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचं काय झालं हे आजच (25 नोव्हेंबर) किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिकसाठी 15 कोटी मोजल्याची चर्चा आहे. इतकंच नाही, तर 15 कोटींवर उचलून आणखी काही रक्कम देणार आहे. मात्र, ती किती रक्कम असणार? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे हे खेळाच्या नैतिकेतमध्ये बसते का? अशीही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, गुजरातने पैसे घेऊन बदल्यात मुंबईकडून कोणताही खेळाडू घेणार नाही, अशीही चर्चा आहे.
Hardik Pandya deal (Espncricinfo):
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 25, 2023
- Mumbai Indians will pay (15 + X) cr to GT.
- Hardik Pandya will get upto X Cr.
- X is unknown...!!! pic.twitter.com/eSMqsxU7Gm
या खेळाडूंची आतापर्यंत अदलाबदल
दुसरीकडे, 22 नोव्हेंबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला. यामध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांचा फलंदाज देवदत्त पडिक्कल (7.75 कोटी रुपये) आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा गोलंदाज आवेश खान (10 कोटी रुपये) यांची अदलाबदल केली. म्हणजेच आता आवेश खान रॉयल्सच्या जर्सीत तर देवदत्त पडिक्कल लखनौच्या जर्सीत दिसणार आहे. या आधी दुसरी बदली झाली होती. 3 नोव्हेंबर रोजी रोमारियो शेफर्ड मुंबई इंडियन्समध्ये गेला. तो यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.
Mumbai Indians will pay Gujarat Titans an undisclosed sum of money in addition to the 15Cr. (Espncricinfo). pic.twitter.com/jmGIS1c9xZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 24, 2023
हार्दिक पांड्या होणार मुंबईचा पुढचा कर्णधार?
हार्दिक पंड्या आयपीएल 2023 पासून मुंबई इंडियन्सच्या संपर्कात होता. 2023 च्या विश्वचषकापूर्वीही त्याच्या आणि मुंबई फ्रँचायझीमध्ये बोलणी निश्चित झाली होती. आता केवळ अधिकृत औपचारिकता पूर्ण व्हायची आहे. अशा स्थितीत हार्दिकचे मुंबई इंडियन्समध्ये जाणे जवळपास निश्चित झाले आहे. रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवणार का, की मुंबईने रोहितला सोडण्याची योजना आखली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहितच्या बदल्यात हार्दिकची गुजरातमधून मुंबईत बदली केली जाण्याचीही शक्यता आहे.
Mumbai Indians might consider releasing Cameron Green & Jofra Archer to generate extra funds of INR 5 Crore. [Cricbuzz] pic.twitter.com/yi2u7kOvEa
— Johns. (@CricCrazyJohns) November 25, 2023
बडे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
उद्या राखीव यादी जाहीर झाल्यानंतर, जाहीर झालेले खेळाडू आणि नव्याने नोंदणी झालेल्या खेळाडूंच्या लिलावाची तयारी सुरू होईल. असे मानले जाते की फ्रँचायझी अनेक महागड्या परदेशी खेळाडूंना सोडू शकतात. यामध्ये बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, कॅमेरॉन ग्रीन आणि हॅरी ब्रूक या नावांचा समावेश आहे. IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या