Haryana Election Results: ऑलिम्पिकमध्ये अपात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?
Haryana Election Results: सध्या भाजपचे योगेश बैरागी जुलाना विधानसभेतून पिछाडीवर आहेत.
Haryana Election Results Vinesh Phogat: जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) सध्या 4500 हजार मतांनी आघाडीवर आहे. विनेश फोगाटच्या विरोधात भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी रिंगणात आहेत. जुलाना विधानसभा जागेवर एकूण 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. यामध्ये सध्या भाजपचे योगेश बैरागी जुलाना विधानसभेतून पिछाडीवर आहेत.
Vinesh Phogat trails after six rounds, Hooda, Aditya Surjewala lead, BJP headed for hat-trick in Haryana
— ANI Digital (@ani_digital) October 8, 2024
Read @ANI Story | https://t.co/dDJ9DtgMkt#vineshphogat #bhupendrahooda #adityasurjewala #congress #haryana #haryanaelection pic.twitter.com/JSBsuvthM8
हरियाणाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्या 90 पैकी 48 जागांवर भाजपने मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसने 36 जागांवर आघाडी घेतली आहे. लोक दल 1 आणि इतर 5 उमेदवार आघाडीवर आहे. हरियाणातील पंचकुला, नारायणगड, अंबाला सिटी, मुल्लाना, सधौरा, जगाधरी, यमुनानगर, शाहबाद, ठाणेसर, पेहोवा, गुहला, कलायत, निलोखेरी, बडोदा, उचाना कलान, टोहाना, रतिया, कालानवली, डबवली, सायर. एलेनाबाद, उकलाना, नारनौंड, हांसी, मेहम, गढ़ी सांपला-किलोई, बदली, बेरी, नूह, फिरोजपूर झिरका, पुनहाना, होडल, प्रिथला आणि फरीदाबाद एनआयटी या मतदारसंघातून काँग्रेस सध्या आघाडीवर आहे.
विनेश फोगाट विरुद्ध कॅप्टन योगेश बैरागी-
विनेश फोगाट काँग्रेसच्या तिकिटावर हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 लढवत आहेत. विनेश फोगाट जींद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. विनेश फोगाटच्या विरोधात भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी रिंगणात आहेत. जुलाना विधानसभा जागेवर एकूण 12 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर 6 सप्टेंबरला विनेशने ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगाटला तिकीट दिली.
काँग्रेसला धक्का-
भाजपने मतमोजणीत केलेले पुनरागमन हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून हरियाणात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्याची चर्चा होती. याशिवाय, शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंचे आंदोलन हाताळण्यात भाजपला आलेले अपयश यामुळे भाजपला हरियाणात फटका बसेल, असे बोलले जात होते. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजपने ही सर्व आव्हाने पार करत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे दिसत आहे.