Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल हाती; नॅशनल कॉन्फरन्स, भाजपची आघाडी; काँग्रेसला मोठा धक्का
Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तेथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली.
Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024) सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास नॅशनल कॉन्फरन्स आघाडी 30, भाजप 29, काँग्रेस 13, पीडीपी 5 आणि इतर 12 जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे एक्झिट पोलनूसार काँग्रेस आघाडीवर असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सुरुवातीच्या आलेल्या कलानूसार नॅशनल कॉन्फरन्स आघाडी आणि भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनूसार तरी जम्मू-काश्मीरमध्ये कोणालाही बहुमत मिळत नसल्याचं दिसून येत आहे.
2014 नंतर पहिल्यांदाच जम्मू- काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. येथे 90 जागांसाठी 873 उमेदवार उभे आहेत. पहिल्या टप्प्यात 61.38 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 57.31 टक्के आणि शेवटच्या टप्प्यात 68.72 टक्के मतदान झाले. एकूण मतदानाची टक्केवारी 63.45 आहे जी 2014 च्या तुलनेत सुमारे दोन टक्के कमी आहे. दरम्यान, केंद्रशासित प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा पाठिंबा घेण्यास कोणताही विरोध नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच निवडणूक-
जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तेथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे. भाजपसाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचवेळी या दोन्ही निर्णयांना विरोध करणारी काँग्रेस यावेळी नॅशनल कॉन्फरन्ससोबत निवडणूक लढवत आहे. पीडीपी एकट्याने निवडणूक लढवत आहे. याशिवाय काही प्रादेशिक पक्षांनीही उमेदवार उभे केले आहेत. याकडे स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचेही लक्ष लागले आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल-
मॅट्रिझ एक्झिट पोल
काँग्रेस+NC - 28-30
भाजप - 28-30
PDP- 05-07
OTH- 08-16
दैनिक भास्करचा एक्झिट पोल
काँग्रेस+NC - 35-40
भाजप - 20-25
PDP - 04-07
OTH - 12-16
Axis My India
काँग्रेस+NC - 35-4
भाजप - 24-34
PDP - 04-06
OTH - 08-23
इंडिया टुडे सी-व्होटर एक्झिट पोल
काँग्रेस+NC - 40-48
भाजप - 25-27
PDP - 06-12
OTH - 06-11
पीपल्स पल्स एक्झिट पोल
काँग्रेस+NC - 46-50
भाजप- 23-27
PDP-07-11
OTH-04-06
मॅट्रिक्स एक्झिट पोल
काँग्रेस+NC - 28-30
भाजप - 28-30
PDP -05-07
OTH -08-16