एक्स्प्लोर
हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड करणारी 'नताशा' आहे तरी कोण?
हार्दिक पंड्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत एन्गेड्ज झाल्याची बातमी दिली आहे. या पोस्टनंतर त्याची गर्लफ्रेंड नताशा गुगल सर्चमध्ये ट्रेंडींगवर आली आहे.
मुंबई : गुगलवर गेल्या 24 तासांमध्ये नताशा स्टॅनकोविक हे नाव वारंवार सर्च केलं जातं आहे. कारण, नताशा स्टॅनकोविक ही ती मुलगी आहे, जिच्यावर क्रिकेटर हार्दिक पंड्या क्लिन बोल्ड झाला आहे. नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिक पंड्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गर्लफ्रेंडला प्रपोज करतानाचा व्हिडीओ शेअर करत एन्गेड्ज झाल्याची बातमी दिली. तेव्हापासून या नताशा स्टॅनकोविकबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
नताशा ही सर्बियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून नताशानं बॉलिवूड डेब्यू केला होता. बिग बॉस सिझन 8 आणि रॅपर बादशाहच्या डिजे वाले बाबू मेरा गाना चला दे, या गाण्यातून नताशा प्रकाशझोतात आली. डान्स रिअॅलिटी शो नच बलिएमध्येही नताशा अली गोणीसोबत सहभागी झाली होती. 2012 मध्ये अभिनयात करिअर करण्यासाठी भारतात आलेल्या नताशाने शाहरुख खानच्या झीरो सिनेमातही छोटी भूमिका साकारली होती.
हेही वाचा - Year Ender 2019 : देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या क्रीडा घडामोडी
हेही वाचा - धोनीची आयपीएलमधील कामगिरी त्याचं क्रिकेटमधील भविष्य ठरवेल : अनिल कुंबळे विराट अनुष्का, हरबजन गिता बसरा, युवराज सिंग हेजल किच या क्रिकेटर अॅक्ट्रेसच्या जोड्यांचा ट्रेन्ड सेट होत असताना आता त्यात हार्दिक नताशाचंही नाव यामुळे सहभागी झालं आहे. फोटो शेअर करताना हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्थान! फोटोनंतर हार्दिक आणि नताशाचे हे विवाहबंधनात कधी अडकणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहेत. 'कॉफी विद करण' कार्यक्रमामुळे हार्दिक झाला होता ट्रोल - 'कॉफी विद करण'मध्ये महिलांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली होती. 25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. यानंतर लोक सोशल मीडियावर जोरदार टीका करत आहे. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं. त्यानंतर त्याने माफीही मागितली होती. हेही वाचा - IPL 2020 | 'या' तारखेला आयपीएलच्या 13 व्या सीझनचा वाजणार बिगुलView this post on InstagramMai tera, Tu meri jaane, saara Hindustan. ???????? 01.01.2020 ❤️ #engaged
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement