एक्स्प्लोर
Advertisement
IPL 2020 | 'या' तारखेला आयपीएलच्या 13 व्या सीझनचा वाजणार बिगुल
आयपीएलच्या 13 व्या सीझनची सुरुवात वर्ष 2020 मध्ये होणार आहे. मागील सीझनचे विजेतेपद मुंबई इंडियन्स संघाने पटकावले होते.
मुंबई : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनची सुरुवात नवीन वर्षात 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये होणार आहे. विद्यमान चँपियन संघ मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर आयपीएल जेतेपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. आयपीएलच्या सीझनची सुरुवात करण्यासाठी 29 मार्च हा दिवस निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. "नवीन वर्ष 2020 मध्ये 29 मार्चला आयपीएलच्या 13 व्या सीझनची सुरुवात मुंबईत होणार असल्याचे मला सांगण्यात आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
आयपीएलची सुरुवात मार्चमध्ये होणार असल्याने सुरुवातीचे काही सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्युझीलंडचे खेळाडू मुकणार आहे. कारण, या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये टी-20 मालिका खेळली जाणार आहे. तर, इंग्लंड आणि श्रीलंका क्रिकेट संघामध्ये कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिका 31 मार्चपर्यंत चालणार असल्याने सुरुवातीचे काही सामन्यात या देशातील खेळाडू सहभागी होऊ शकणार नाही.
यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल पुन्हा जुन्या फॉर्मटच्या आधारे डबल हेडरचे आयोजन करण्यात येणार आहे. तर, याची सुरुवात एक एप्रिलपासून सुरू होईल, अशी माहिती एका फ्रँचायझीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. आयपीएल गवर्निंग काउन्सील या हंगामात जास्तीत जास्त डबल हेडर करण्याच्या विचारात आहे. यामुळे प्रेक्षकांना सामना बघण्याचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल.
आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा -
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आगामी आयपीएलसाठी झालेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल साडेपंधरा कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. आयपीएलच्या या लिलावात ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. किंग्स इलेव्हन पंजाबनं मॅक्सवेलवर पावणेअकरा कोटींची बोली लावली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर बंगलोरनं दहा कोटी रुपयांची बोली लावली. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे साडेआठ कोटी आणि पावणेआठ कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं. लेग स्पिनर पियुष चावला हा भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पियुष चावलाला चेन्नई सुपर किंग्सनं सहा कोटी 75 लाखांची बोली लावली.
हेही वाचा - IPL auction : आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू तर मुंबईचा यशस्वी जैस्वाल करोडपती
Yashasvi Jaiswal | अवघ्या 18व्या वर्षी मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वाल करोडपती | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement