Harbhajan Singh: हरभजन सिंहचा पीसीए अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप
Harbhajan Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांनी शुक्रवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (PCA) अध्यक्ष गुलजार इंदरसिंगृह चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला.
Harbhajan Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांनी शुक्रवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (PCA) अध्यक्ष गुलजार इंदरसिंगृह चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. "पीसीएमध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडत असल्याची तक्रार माझ्याकडं अनेकांनी केली होती. कारण मी पीसीएचा मुख्य सल्लागार आणि राज्यसभेचा सदस्य आहे. त्यामुळं काही चुकीचं घडत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे," असं हरभजन सिंहनं म्हटलंय.
हरभजन सिंहनं पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गुलजार इंदरसिंह चहल यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. उघडली आहे. दरम्यान, हरभजन सिंहच्या पत्रानं सूपर्ण पीसीए कार्यकारिणीत खळबळ माजली आहे. हरभजन सिंहनं पत्रद्वारे पीसीए आणि विद्यामान अध्यक्षांवर विविध बेकायदेशीर काम केल्याचं आरोप केले आहेत.
हरभजन सिंहनं काय म्हटलं?
"मी चौकशी केली असता मला कळले की, स्वतःला इथे टिकवण्यासाठी आणि पीसीएवर कब्जा करण्यासाठी 120 लोकांना इथं सदस्य बनवलं जात आहे. या चुकीच्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. ज्या नवीन सदस्यांची भरती केली जात आहे, ती थांबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी बीसीसीआय आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडंही तक्रार करायची आहे. असेच सुरू राहिल्यास क्रिकेटची प्रगती कशी होणार? क्रिकेट पारदर्शकता ठेवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. जेव्हा कोणाला सदस्य करायचं असतं, तेव्हा सर्वप्रथम आपल्याला ऑप्टिक्स कौन्सिलसमोर हा मुद्दा मांडावा लागतो. किती सदस्य आणि कोणाला सभासद बनवायचे ते ठरवतात. त्यानंतर आमंत्रणे पाठवली जातात. येथे एपिक्स काउंसिलसह कोणतीही चर्चा झाली नाही. ना मुख्य सल्लागारांशी चर्चा करण्यात आली. त्यानं थेट आमंत्रण पाठवण्यात आलं. ज्यात काही खास लोकांनाच आमंत्रण पाठवण्यात आली. त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. जर भविष्यात मताची गरज भासल्यास ते जिंकून येऊ शकतात आणि पीसीएवरील त्यांचं वर्चस्व कायम ठेवू शकतात", असंही हरभजन सिंहनं म्हटलंय.
सामान्य लोकांसाठी हरभजनकडून चिंता व्यक्त
"सर्वत्र त्यांचंच वर्चस्व असावं, असं त्यांना वाटत आहे. येत्या काही वर्षात त्यांना हटवणं अशक्य होईल. जर काही समस्या असतील तर त्या सर्वोच्च परिषदेच्या अंतर्गत आणि जर्नल बॉडीच्या अंतर्गत मांडाव्यात. तर यावर काही तोडगा निघू शकतो. जे प्रमुख बोलणार, तेच त्यांनी केलं, याकडं दुर्लक्ष केलं गेलं. अशीच माणसं पुढं राहिली तर तुम्ही लोक पुढं येऊ शकणार नाहीत आणि आपण इथपर्यंत पोहोचू याची कल्पनाही सामान्य माणूस करू शकणार नाहीत", असंही हरभजन सिंहनं म्हटलंय.
हे देखील वाचा-