एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही आव्हान दिलेले नाही, एकनाथ शिंदेंनीही हे याचिकेत मान्य केलंय; ठाकरे गटाचा युक्तिवाद

ठाकरे गटाकडून आज महत्वाचा दावा निवडणूक आयोगासमोर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या उत्तराचे सगळे तपशील एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. 

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Group : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) वाद आता निर्णायक टप्प्यावर आहे. दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यात ठाकरे गटाकडून आज महत्वाचा दावा निवडणूक आयोगासमोर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या उत्तराचे सगळे तपशील एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. 

अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत युक्तिवाद सुरु आहे. शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

शपथपत्रे सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा

राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत.  फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही आव्हान दिले गेलेले नाही.  एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे.  ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत युक्तिवाद केला आहे. त्यामुळे चिन्हाबाबतचा कुठलाही दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही. मुख्य नेता या पदावर शिंदेंनी स्वतःला नेमलं आहे पण अशा पद्धतीचे कुठलेही पद शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही, असा दावा देखील ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला आहे. 

अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारच उतरवणार नाहीत तर मग चिन्ह का मागत आहेत? याउलट ज्या जागेवर निवडणूक होत आहे तिथे आधी आमचाच उमेदवार आहे. त्यामुळे चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी. शिंदे गट या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याने चिन्हाबाबत निर्णय घेण्याची कुठलीही तातडीची परिस्थिती नाही, असा दावा देखील ठाकरे गटानं आयोगासमोर केला आहे. 

घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय दाखवता येऊ शकतो? अरविंद सावंतांचा सवाल

अरविंद सावंत म्हणाले की,  निवडणूक आयोगाकडे आज शिवसेनेच्या वतीने सचिव अनिल देसाई यांनी सर्व प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. आम्ही सादर केलेल्या सर्व प्रति या सत्य आहेत. शिवसेना कुणाची तर ती शिवसैनिकांची. आमदार, खासदार कोण?  त्यांनी निवडून दिलं म्हणून आम्ही निवडून आलो. पक्ष पहिला आहे आणि पक्षाला ते चिन्ह मिळालेलं आहे. म्हणून आम्हाला निवडणुकीसाठी ते चिन्ह मिळालं.  शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. त्या मान्यता प्राप्त पक्षात जी निवड होते ती पक्ष प्रमुख करतात. नुकतीच आमची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. त्यात 2023 पर्यंत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली. त्यामुळे हे कोण? असा सवाल सावंतांनी केला आहे. घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय दाखवता येऊ शकतो, असंही सावंत म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिलेले शेड्युल 10 हे जाणीवपूर्वक झाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पक्षांतर बंदींचा कायदाच त्यासाठी बनवण्यात आला. मात्र हाच कायदा पायदळी तुडवला जात आहे.  कायदा कसा झुकवला जातो. संस्थांचा वापर कसा होतोय हे जनता पाहतेय. त्याची ही उदाहरण आहेत. निवडणूक आयोगाने 24 तासही दिलेले नाहीत, असंही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई; निवडणूक आयोगाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, दिले महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Politics Shivsena: धनुष्यबाण कोणाचा? शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला उत्तर सादर, वकील म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 Pm : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP MajhaSunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget