एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra : 'आरएसएस आणि सावरकर इंग्रजांना मदत करत होते', राहुल गांधींचं वक्तव्य, भाजपकडून निषेध

Bharat Jodo Yatra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता, असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.

Bharat Jodo Yatra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता, असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. भारत जोडो यात्रेला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राहुल गांधी यांनी आरएसएस आणि सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये आली आहे. या यात्रेला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झालाय. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी तुमकुरुमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  माझ्या माहितीनुसार आरएसएस इंग्रजांची मदत करत होते. तसेच सावरकर यांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप कुठेही दिसलं नाही. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. 
 
काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभ भाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, असे राहुल गांधी म्हणाले. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही.  द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधींना इतिहास माहित नाही - फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. राहुल गांधी यांना इतिहास माहित नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

राहुल गांधी यांनी पुन्हा आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांचा मी निषेध करतो. सावरकर यांच्या मागे मोठ्या प्रमाणातील भारतातील जनता होती. जाणीवपूर्वक सावरकर यांना अपमानित केलं जात आहे.  अंदमानच्या काळकोठडीत सावरकर यांनी शिक्षा भोगली आहे. यामध्ये सावरकर यांचं वेगेळेपण यासाठी की त्यांच्यामुळे अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली. राहुल गांधी यांना कोणताही इतिहास माहीत नाही. माझा उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे की, ते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहेत की सर्मथन करणार आहेत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP: मोठी बातमी: भाजपने भाकरी फिरवली! दिल्ली, हरियाणासह 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले; केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी
भाजपने भाकरी फिरवली! दिल्ली, हरियाणासह 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले; केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी
Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?
सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार
CM Thalapathy Vijay Meet PM Modi: हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ
हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर स्मितहास्य; तामिळनाडूचे डॅशिंग मुख्यमंत्री थलपती विजय पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी, 25 मिनिटांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Pandharpur VIP Darshan: खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
खरा विठ्ठल भेटला..! VIP च्या जागी सर्वसामान्य भाविकाला विठ्ठल दर्शनाची संधी, पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
Rinku Rajguru Aakash Thosar: रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
रिंकू राजगुरू अन् आकाशच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण; चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर म्हणाली,'मी तयार आहे, आकाशला विचारायला हवं'
Siddaramaiah : अखेर सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार, नव्या सरकारची स्थापना कधी?
सिद्धारामय्या यांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा, काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार
Nashik Ring Road Controversy: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या 'पिंडदानाचा' कार्यक्रम पोलिसांनी रोखला, नेमकं काय घडलं?
Vidhan Parishad Election 2026 Thane: ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बविआच्या 71 मतांना सोन्याचा भाव, शिंदे गट-भाजपकडून ठाकुरांची मनधरणी, नेमकं गणित काय?
ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बविआच्या 71 मतांना सोन्याचा भाव, शिंदे गट-भाजपकडून ठाकुरांची मनधरणी, नेमकं गणित काय?
Embed widget