एक्स्प्लोर
सरकार ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्याच्या तयारीत
ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी आता शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाने याबाबत अनेकांशी चर्चाही सुरु केली असून याचा मुसदा तयार करण्यासाठी किमान दोन वर्ष लागतील, अशी माहिती आहे.

नवी दिल्ली : ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी आता शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाने याबाबत अनेकांशी चर्चाही सुरु केली असून याचा मुसदा तयार करण्यासाठी किमान दोन वर्ष लागतील, अशी माहिती आहे. क्रीडा मंत्रालय ब्रिटनमधील अधिकृत आणि कायदेशीर ऑनलाईन बेटिंगसंदर्भात मार्गदर्शन घेणार आहे. क्रीडा सचिव इंजेती श्रीनावस सध्या इंग्लंडमध्येच असून ते इंग्लंडशी याबाबत सामंजस्य करार करण्याचीही शक्यता आहे. इंग्लंडमध्ये ऑनलाईन बेटिंगबाबत प्रभावी कायदे आहेत. भारतातही तसं शक्य असेल, तर ऑनलाईन बेटिंग अधिकृत केली जाईल, असं क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटलं आहे. भारतात सध्या बेटिंगचं अनधिकृत मार्केट अंदाजे 9.6 लाख कोटींचं आहे. यामध्ये स्थानिक बूकी आणि अनधिकृत वेबसाईट्सचा समावेश आहे. भारतात सध्या फक्त अश्वशर्यतीवरील बेटिंगच अधिकृत आहे, ज्याला जीएसटीमध्ये 28 टक्के टॅक्स लावण्यात आला आहे. ऑनलाईन बेटिंग भारतातील खेळाच्या विकासासाठीही फायदेशीर ठरणार आहे. कारण अधिकृत बेटिंगवर जो कर लावला जाईल. तो सरकारला मिळेल. त्यामुळे सरकार याबाबत गांभार्याने विचार करत आहे, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.
आणखी वाचा























