एक्स्प्लोर
Advertisement
WWE च्या आखाड्यात गोल्डबर्गची पुन्हा एन्ट्री
मुंबई: WWE च्या जगतात आपलं वेगळं अस्तित्त्व निर्माण करणारा कुस्तीपटू गोल्डबर्गने 12 वर्षांनंतर पुन्हा WWE च्या आखाड्यात एन्ट्री केली आहे. गोल्डबर्गने सोमवारी ‘रॉ’मध्ये पुनरागमन करुन कुस्तीपटू ब्रॉक लेसनरचं आव्हान स्विकारलं. यावेळी गोल्डबर्गच्या चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला.
त्यामुळे गोल्डबर्ग आणि ब्रॉक लेसनर यांच्यातील द्वंद्व पाहण्याची नामी संधी ‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या चाहत्यांना मिळणार आहे.
गोल्डबर्ग सोमवारी ‘रॉ’मध्ये दाखल होताच सर्वांचा एकच जल्लोष सुरू झाला होता. ब्रॉक लेसनर हे आपले केवळ पुढचे नाही, तर अखेरचे लक्ष्य असल्याचे गोल्डबर्गने यावेळी सांगितलं.
गोल्डबर्ग आणि ब्रॉक लेसनर यांच्या सामन्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी या सामन्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ‘रॉ’च्या सर्व्हायवर सीरिजमध्ये दोघांचा सामना होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गोल्डबर्गने ‘डब्ल्यूडब्ल्यई’ विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचे असंख्य चाहते आहेत. गोल्डबर्गने ‘डब्ल्यूडब्ल्यूई’मध्ये तब्बल 173 सामने लागोपाठ जिंकले होते. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशीपचा किताबही त्याने पटकावला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement