एक्स्प्लोर
41 व्या वर्षी महेला जयवर्धनेचं पुनरागमन
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेला जयवर्धने वयाच्या 41 वर्षी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. 2015मध्ये जयवर्धनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं.
कोलंबो : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेला जयवर्धने वयाच्या 41 वर्षी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे, मात्र तो श्रीलंकेकडून नव्हे तर एका क्लबकडून खेळणार आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेत जयवर्धने मॅरीलबोन क्रिकेट क्लबकडून खेळणार आहे. जयवर्धनेला मॅरीलबोन क्रिकेट क्लबचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. या मालिकेतमध्ये नेपाळ आणि नेदरलँडचा संघही सहभागी होणार आहे.
2015मध्ये जयवर्धनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं. जयवर्धने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटमधील योगदानासाठी जयवर्धनेला 2015मध्ये एमसीसीची (मॅरीलबोन क्रिकेट क्लब) लाईफ टाईम मेंबरशीप देण्यात आली होती.
जयवर्धनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजारहून जास्त धावा केल्या आहेत. निवृत्तीनंतर जयवर्धने अनेक टी-20 लीग सामने खेळले. याशिवाय आयपीएल आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे.
जयवर्धनेच्या व्यतिरिक्त या तिरंगी मालिकेमध्ये स्कॉटलँडचे डिनल बड, अलास्डेअर इवांस आणि मार्क वाय हे खेळाडू सहभागी होणार आहेत. 29 जुलैला या ट्राय सीरिजला सुरुवात होणार असून एमसीसी पहिले दोन सामने नेपाळ आणि नेदरलँडविरद्ध होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement