एक्स्प्लोर
'रावळपिंडी एक्स्प्रेस' बाबा झाला, शोएब अख्तरला पुत्ररत्न

इस्लामाबाद : 'रावळपिंडी एक्स्प्रेस' अशी ख्याती असलेला पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पिता झाला आहे. पत्नी रुबाब आणि आपल्याला मुलगा झाल्याची घोषणा अख्तरने सोमवारी ट्विटरवरुन केली. 'मला आणि बेगमला नुकतंच सुदृढ बाळ झाल्याची घोषणा करताना मला अत्यानंद होत आहे. ही वेगळीच भावना आहे! अल्लाचे आभार' असं अख्तरने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'आई आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. रावळपिंडी एक्स्प्रेस आता प्राऊड पापा आहे' असं त्याने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/shoaib100mph/status/795637297182081024 https://twitter.com/shoaib100mph/status/795638537873932288 शोएब आणि रुबाब यांचा 25 जून 2014 रोजी निकाह झाला होता. पाकिस्तानमधील सद्यस्थिती पाहता कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला पाकमध्ये बोलावू नये, असं विधान केल्यानंतर शोएब नुकताच प्रसिद्धीझोतात आला होता.
आणखी वाचा























