Sports Quota : कोणत्या खेळाडूंना स्पोर्ट्स कोट्यातून मिळते सरकारी नोकरी? कोणत्या खेळांसाठी असतो स्पोर्ट्स कोटा? वाचा सविस्तर
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Sports Quota : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडी (Dahihandi 2022) सणाच्या आदल्यादिवशीच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. यानंतर नेमकं कोणत्या खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कोटा असतो आणि कोणत्या खेळाडूंना स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी मिळते? या चर्चांना उधाण आलं असून याबद्दल जाणून घेऊ...
स्पोर्ट्स कोट्याद्वारे भरतीसाठी किमान पात्रता निकष 10वी आणि इंटरमिजिएट आहे. क्रीडा कोट्यातील नोकऱ्यांसाठी सर्व विभागांचे वेगवेगळे निवड निकष आहेत, जे खेळाडूंना पूर्ण करणे अनिवार्य आहे. याशिवाय, क्रीडा कोट्यातील नोकरीसाठी वेगवेगळ्या ग्रेड पेनुसार विविध गुणवत्तेच्या निकषांचीही तरतूद आहे. या आदेशांनुसार खालील निकषांच्या संदर्भात गुणवान समजल्या जाणार्या खेळाडूंच्या नियुक्त्या केल्या जाऊ शकतात.
दरम्यान 43 खेळ आहेत ज्यासाठी खालील क्षेत्रातील क्रीडा खेळाडूंना गुणवत्तेच्या आधारावर नोकरी दिली जाते-
धनुर्विद्या
ऍथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटसह)
आत्या-पाट्या
बॅडमिंटन
बॉल-बॅडमिंटन
बास्केटबॉल
बिलियर्ड्स आणि स्नूकर
बॉक्सिंग
ब्रिज
कॅरम
बुद्धिबळ
क्रिकेट
सायकलिंग
घोडेस्वार खेळ
फुटबॉल
गोल्फ
जिम्नॅस्टिक्स (बॉडी बिल्डिंगसह)
हँडबॉल
हॉकी
आइस-स्कीइंग
आइस हॉकी
आईस-स्केटिंग
ज्युडो
कबड्डी
कराटे-DO
कयाकिंग आणि कॅनोइंग
खो-खो
पोलो
पॉवरलिफ्टिंग
रायफल शूटिंग
रोलर स्केटिंग
रोइंग
सॉफ्ट बॉल
स्क्वॅश
पोहणे
टेबल टेनिस
तायक्वांदो
टेनिस-कोइट
टेनिस
व्हॉलीबॉल
वजन उचल
कुस्ती
यॅचिंग
कोणते खेळाडू असतात या नोकऱ्यांसाठी पात्र?
- ज्या विद्यार्थ्यांनी आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळांनी आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे.
- राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार स्पोर्ट्स कोट्यासाठी पात्र असतात.
- अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित शाळांसाठी राष्ट्रीय खेळ/खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार
- नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले खेळाडू.
हे देखील वाचा-