IND vs ZIM : शिखर-शुभमनची अभेद्य भागिदारी, भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी
IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 10 विकेट्सनी मोठा विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यावेळी सलामीवीर शुभमन आणि शिखर दोघांनी अप्रतिम अशी अर्धशतकं झळकावली आहेत.
Zimbabwe Vs India, 1st ODI Highlights : भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघाला त्यांच्याच भूमीत 10 गडी राखून मात दिली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे. सामन्यात आधी भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णासह फिरकीपटू अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यापुढं झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 189 धावांवर झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला, त्यानंतर भारताचे सलामीवीर शुभमन गिल (नाबाद 82) आणि शिखर धवन (नाबाद 81) या दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावत संघाला 10 विकेट्सनी विजय मिळवून दिला.
That's that from the 1st ODI.
— BCCI (@BCCI) August 18, 2022
An unbeaten 192 run stand between @SDhawan25 & @ShubmanGill as #TeamIndia win by 10 wickets.
Scorecard - https://t.co/P3fZPWilGM #ZIMvIND pic.twitter.com/jcuGMG0oIG
सामन्यात सर्वात प्रथम भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या तदीवांशे मरुमानी, इनोसंट काया यांना बाद करून दीपक चहरनं झिम्बाब्वेच्या संघाला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर झिम्बाब्वे संघानं सातत्यानं विकेट्स गमावली. झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगीज चकाब्वानं सर्वाधिक 35 धावांची खेळी. रेगीज चकाब्वानंतर रिचर्ड येनगारावा (33 धावा) आणि ब्रॅडली इवांसनं (नाबाद 34 धावा) अखेरिस फटकेबाजी केली. ज्यामुळं झिम्बाब्वेच्या संघाला 40.3 षटकात 189 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, फिरकीपटू अक्षर पटेलच्या खात्यातही तीन विकेट्स जमा झाल्या. याशिवाय, मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली.
शिखर-शुभमनची अभेद्य भागिदारी
190 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून सलामीवीर शुभमन आणि शिखर या दोघांनी अगदी अप्रतिम अशी सुरुवात भारताला करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच अगदी उत्तम फलंदाजी करत भारताला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. शुभमनने 72 चेंडूत नाबाद 82 तर शिखरने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. ज्यामुळे 30.5 षटकातच भारताने 192 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली.
भारत- झिम्बाव्वे उर्वरीत एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
दुसरा एकदिवसीय सामना | 20 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
हे देखील वाचा-