एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : नेमार स्वित्झर्लंडविरुद्ध मैदानात उतरणार
फेब्रुवारीत पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना नेमारच्या उजव्या पायाचं हाड मोडलं होतं.

रशिया : ब्राझिलचा स्टार फुटबॉलवीर नेमारच्या विश्वचषकात खेळण्याविषयीच्या साऱ्या शंकाकुशंका आता दूर झाल्या आहेत. ब्राझिलच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे की, नेमार स्वित्झर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. ब्राझिल आणि स्वित्झर्लंड संघांमधला सामना रविवारी रात्री साडेअकरा वाजता सुरू होईल. फेब्रुवारीत पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना नेमारच्या उजव्या पायाचं हाड मोडलं होतं. त्याच्या या दुखापतीवर मार्च महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या दुखापतीतून सावरलेला नेमार सराव सामन्यांमध्ये मिळून केवळ 129 मिनिटं मैदानात उतरला आहे. त्यामुळं तो विश्वचषकात खेळणार की नाही, याविषयी अनिश्चिततेचं वातावरण होतं. पण ते आता दूर झालं आहे.
आणखी वाचा























