एक्स्प्लोर
Advertisement
आयपीएलमध्ये लोकेश राहुलची फास्टेस्ट फिफ्टी
आयपीएलच्या दहाव्या मोसमात कोलकाता नाईट राईडर्सच्या सुनील नारायणनं 15 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. राहुलनं दिल्लीविरुद्धच्या आजच्या सामन्यात हा विक्रम मोडीत काढला.
मोहाली : किंग्स इलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुलनं आयपीएलमध्ये आजवरच्या सर्वात जलद अर्धशतकाची नोंद केली. राहुलनं अवघ्या 14 चेंडूत आपलं अर्धशतक साजरं केलं.
राहुलच्या या अर्धशतकाला सहा चौकार आणि चार षटकारांचा साज होता. याआधी आयपीएलच्या दहाव्या मोसमात कोलकाता नाईट राईडर्सच्या सुनील नारायणनं 15 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. राहुलनं दिल्लीविरुद्धच्या आजच्या सामन्यात हा विक्रम मोडीत काढला.
लोकेश राहुलच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात दिल्लीनं पंजाबसमोर विजयासाठी 20 षटकात 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पंजाबनं हे आव्हान 18.5 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं.
आयपीएलच्या अकराव्या पर्वातील हा दुसरा सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आला. किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलनं अवघ्या 16 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यात सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. राहुलचं हे अर्धशतक आयपीएलमधलं आजवरचं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. त्याआधी गौतम गंभीरनं 42 चेंडूत 55 धावांची खेळत दिल्लीला 20 षटकात सात बाद 166 धावांची मजल मारुन दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement