Dutee Chand Suspended : भारताची स्टार धावपटू दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात, थेट निलंबनाची कारवाई
Dutee Chand : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद ही डोप चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला थेट निलंबित करण्यात आले आहे.
![Dutee Chand Suspended : भारताची स्टार धावपटू दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात, थेट निलंबनाची कारवाई Dutee Chand tests positive for prohibited substances, provisionally suspended after dope test know details Dutee Chand Suspended : भारताची स्टार धावपटू दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात, थेट निलंबनाची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/2420446e25137cfd3cb6953a320e502f1674054503474323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dutee Chand Provisionally suspended : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand) हिला एक मोठा धक्का बसला आहे. दुती चंदला प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतर तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुतीच्या (Dutee Chand )डोपिंग चाचणीच्या (Doping Test) रिपोर्टमध्ये अनेक प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्यानंतर तिच्यावर ही कारवाई झाली आहे.
दरम्यान या निलंबनानंतर दुतीने दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, 'मला अद्याप याबद्दल कोणतीही माहिती नाही. मला कोणाकडूनही माझी डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळालेली नाही. हे जाणून घेतल्याशिवाय मी या संदर्भात कोणतंही पाऊल उचलू शकत नाही. याबद्दल नेमकी माहिती घेऊन त्यानुसार मला पुढील पाऊल उचलावे लागेल. धनलक्ष्मी आणि इतर अनेकांसोबत घडल्याप्रमाणे, त्यांना एक पत्र पाठवून त्यांच्या चुकीबाबत नेमकं कळवलं. मला अद्याप कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. मी निलंबनाविरोधात अपील करणार आहे. दुती चंदचा नमुना ए चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर तिने अपील केल्यास नमुना बी चाचणी केली जाईल. तिच्या पॉझिटीव्ह आलेल्या चाचणीमध्ये निवडक एंड्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर (एसएआरएम) समाविष्ट असल्याची माहिती मिळाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले रौप्य पदक
दुती चंद ही भारतातील स्टार महिला धावपटूंपैकी एक आहे. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटर आणि 200 मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला धावपटू आहे. दुती चंद तिच्या निलंबनाविरोधात अपील करण्याच्या तयारीत आहे. आता सॅम्पल बी चाचणीनंतर कळेल नक्की दुती दोषी आहे का? आणि तिच्यावरील निलंबनाची कारवाई नेमकी किती दिवसाची असणार आहे.
समलैंगिक पार्टनरसोबत दुती प्रेमसंबधात
दुती हिने आपण समलैंगिक असल्याचं याआधीच जाहीर केलं होतं. ज्यानंतर तिने तिची मैत्रिण मोनालिसासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही आपल्या सोशल मीडियावरुन सांगितलं होतं. ती कायम दोघींचे फोटोही शेअर करत असते. ज्यानंतर काही दिवसांपूर्वी दुती चंद आणि मोनालिसाचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून या दोघींनी लग्न केलं की काय? अशी चर्चा सुरु होती. मात्र दोघींच्या लग्नाबाबत नेमकी अधिकृत माहिती समोर आली नाही.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)