एक्स्प्लोर
फुटबॉलचा ‘जादुगार’ डिएगो मॅराडोना काळाच्या पडद्याआड; श्रद्धांजली देताना दिग्गज भावूक
जगातील महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं 60 व्या वर्षी निधन झालं आहे.
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाच्या मीडियाने याबाबत माहिती दिली आहे. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. मॅराडोना यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले, "डिएगो मॅराडोना हे एक जादूगार होते. ज्यांनी फुटबॉल खेळ अप्रतिम बनवला होता. त्यांच्या कुटुंबियांना,चाहत्यांना माझं प्रेम आणि संवेदना."
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांनी एक ट्वीट केलं आहे. सचिन म्हणाला , "क्रीडा आणि फुटबॉल जगतातील एका महान खेळाडूला आज आपण गमावले आहे. रेस्ट इन पीस मॅराडोना! तुमची कायम आठवण येईल".Diego #Maradona, the legend has left us. He was a magician who showed us why football is called “The beautiful game”. My condolences to his family, friends and fans. Gracias Argentina.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 25, 2020
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही मॅराडोना यांच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे. मॅराडोना यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे.त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!'Football and the world of sports has lost one of its greatest players today. Rest in Peace Diego Maradona! You shall be missed. pic.twitter.com/QxhuROZ5a5
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 25, 2020
30 ऑक्टोबरला केला होता 60 वा वाढदिवस 30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते.Arguably one of the greatest sportsman of all time. Saddened to hear about the passing away of the great Diego Maradona. My heartfelt condolences to his family. pic.twitter.com/L7ewMHOnnJ
— Virender Sehwag (@virendersehwag) November 25, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement