Viral Video: भर रस्त्यात टॉवेल गुंडाळून आंघोळ करू लागली मॉडेल, नंतर मेकअप केला अन् गर्दीसमोरच बदलले कपडे VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक प्रसिद्ध मॉडेल रस्त्यावर आंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिनं टॉवेल गुंडाळल्याचं पाहायला मिळत आहे.

Viral Video: सध्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Vedio Viral) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मॉडेल चक्क टॉवेल गुंडाळून रस्त्यावर फिरत असल्याचं दिसतंय. एवढंच काय तर, रस्त्यावरच आंघोळ करुन ती कपडे बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.
रस्त्यावरच आंघोळ करू लागली मॉडेल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक प्रसिद्ध मॉडेल रस्त्यावर आंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिनं टॉवेल गुंडाळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर ती भर वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध तिचे केस धुवायला सुरुवात करते. एवढंच काय तर, ती तिच्या केसांना शॅम्पू लावले आणि अंगावर साबण फासते. मग बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला बाटलीतून केसांवर पाणी टाकायला सांगते आणि केस धुते.
View this post on Instagram
View this post on Instagram
रस्त्याच्या मधोमध आंघोळ केली, कपडेही बदलले
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आंघोळ झाल्यावर ती रस्त्यातच तयारी करायला सुरुवात करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ती रस्त्यातच उभ्या असलेल्या मुलीच्या हातात कानातले देते आणि तिला कानात घालायला लावते. इतकंच नाहीतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीच्या आरशात पाहून तिचा लूक कम्प्लिट करते. रस्त्यावरुन जाणारे येणारे सगळेच तिच्याकडे पाहत असतात. त्यानंतर अचानक ती तिच्या अंगावरचा टॉवेल बाजूला करते, क्षणभरासाठी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. पण, त्यानंतर काही काळातच दिसतं की, तिनं टॉवेलच्या आत मिनी ड्रेस घातलेला असतो.
इनग्रिड ओहारा कोण?
व्हिडीओमध्ये विचित्रपणे वागत असलेली महिला दुसरी, तिसरी कुणीच नसून इनग्रिड ओहारा आहे. ती 27 वर्षांची ब्राझिलची अॅक्ट्रेस आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ओरिजिनल कंटेंट क्रिएटर आहे. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट @oharaingrid आहे. जिथे तिचे 11 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इनग्रिड ओहारानं 'अस गेमेस'(2019), 'स्ट्रँडेड' (2021) आणि 'द सायलंट वन' यांसारख्या फिल्म्समध्ये दिसून आली आहे.
याआधीही इनग्रिड ओहाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडीओमध्येही ती टॉवेल गुंडाळून रस्त्यावर आली होती आणि लोकांना धक्का बसला. इनग्रिड तिच्यासोबत ट्रॉली बॅग घेऊन जाताना दिसली आणि ट्रॉली बॅग उघडल्यानंतर ती तयार होऊ लागते. इनग्रिडचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना खूप आश्चर्य वाटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























