एक्स्प्लोर

धोनीने घेतलेला DRS निर्णय चुकला, सोशल मीडियावर ट्रोल

धोनी कायमच योग्य वेळी डीआरएस घेतो असं म्हटलं जातं. किंबहुना धोनीने अनेकदा घेतलेले डीआरएस बरोबर असतात. पण यावेळेस मात्र, धोनीचा निर्णय चुकला.

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताने 73 धावांनी विजय मिळवत एक मोठा इतिहास रचला. भारताचा आफ्रिकेमधील गेल्या 25 वर्षातील हा पहिलाच मालिका विजय आहे. त्यामुळे हा सामना भारताच्या दृष्टीने खूपच संस्मरणीय ठरला. या सामन्यात हार्दिक पंड्यापासून कुलदीप यादवपर्यंत सर्वांनीच आपली चमक दाखवली. पण भारतीय गोलंदाजीच्यावेळी एक वेळ अशी आली की, विराट कोहलीला एक चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वत: धोनीही रोखू शकला नाही. टीम इंडियाच्या 275 धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने 16 षटकात 3 गडी गमावून 85 धावा केल्या होत्या. त्यावेळी खेळपट्टीवर हाशिम आमला आणि स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर होते. तर समोर भारताचा यशस्वी फिरकीपटू यजुवेंद्र चहल गोलंदाजी टाकत होता. चहलने आपल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडू जरा जास्त वळवला आणि तो थेट मिलरच्या पॅडवर जाऊन आदळला. यानंतर चहल, कर्णधार कोहली आणि सर्व खेळाडूंनी LBW साठी अपील केलं. पण पंचांनी हे अपील फेटाळून लावत मिलरला नाबाद ठरवलं. यावेळी चहल कर्णधार कोहली आणि धोनीच्या दिशेने जात डीआरएसबाबत चर्चा करु लागला. त्यावेळी विराटने वेळ न गमावता धोनीकडे पाहिलं आणि धोनीनेही डीआरएससाठी हो म्हटलं. धोनीच्या निर्णयावर कायम विश्वास असलेल्या विराटनेही धोनीचा म्हणणं मान्य करत डीआरएस घेतला. पण डीआरएसमध्ये चेंडू स्टम्पला लागत नसल्याचं दिसून आलं आणि भारताने आपला रिव्ह्यूही गमावला. हा निर्णय पाहून स्वत: कोहली हैराण झाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या ड्रेसिंग रुममध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. कारण पहिल्यांदा पाहणाऱ्या प्रत्येकाला मिलर बाद असल्याचं वाटत होतं. पण डीआरएसने सगळ्यांनाच चकवा दिला. धोनी कायमच योग्य वेळी डीआरएस घेतो असं म्हटलं जातं. किंबहुना धोनीने अनेकदा घेतलेले डीआरएस बरोबर असतात. पण यावेळेस मात्र, धोनीचा निर्णय चुकला. त्यानंतर सोशल मीडियावर या एकूण सगळ्या प्रकारावर चाहत्यांनी धोनीला थोडसं ट्रोलही केलं. पाहा ट्विपल्सने धोनीला कसं ट्रोल केलं?

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy 2026-27 : विषयच खोल! मुंबईच्या 4 शिलेदारांनी हिमाचल टीमचा डायरेक्ट कार्यक्रमच केला, 1 डाव आणि 98 धावांनी विजय
विषयच खोल! मुंबईच्या 4 शिलेदारांनी हिमाचल टीमचा डायरेक्ट कार्यक्रमच केला, 1 डाव आणि 98 धावांनी विजय
Hardik Pandya News : हार्दिक पांड्याच्या कमबॅकचा मुहूर्तच सापडेना, फक्त IPL खेळण्यासाठीच फिट होणार? 3 मालिकेतून OUT, विश्वचषकापूर्वी वाढलं टेन्शन
हार्दिक पांड्याच्या कमबॅकचा मुहूर्तच सापडेना, फक्त IPL खेळण्यासाठीच फिट होणार? 3 मालिकेतून OUT, विश्वचषकापूर्वी वाढलं टेन्शन
IND vs NZ 1st T20 : गौतम गंभीरच्या एन्ट्रीनंतर वैभव सूर्यवंशी प्लेइंग-11 मधून बाहेरच; श्रेयस अय्यरने सांगितलं कारण, जे ऐकून सगळेच चक्रावले!
गौतम गंभीरच्या एन्ट्रीनंतर वैभव सूर्यवंशी प्लेइंग-11 मधून बाहेरच; श्रेयस अय्यरने सांगितलं कारण, जे ऐकून सगळेच चक्रावले!
IND vs NZ 1st T20 Live Streaming : JioHotstar नव्हे, आता वेगळ्या OTT वर बघावी लागेल मॅच; भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना कुठे LIVE पाहायचा? जाणून घ्या A टू Z
JioHotstar नव्हे, आता वेगळ्या OTT वर बघावी लागेल मॅच; भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना कुठे LIVE पाहायचा? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Vivekanand Patil MPSC Protest : पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
Embed widget