एक्स्प्लोर
पॉटिंगचा विक्रम तोडण्यापासून धोनी एक पाऊल दूर
मुंबई : निरधारीत षटकांच्या सामन्यातील भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने झिम्बाब्वेसोबतच्या तिसऱ्या आणि शेवटच्या लढतीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात नेतृत्व करण्याच्या आस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंमच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
पॉटिंगने आजपर्यंत ३२४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते. आजच्या सामन्यानंतर धोनीने पॉटिंगच्या या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. धोनीने आपल्या करिअरमध्ये ६० कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. तर त्याने निर्धारित षटकांच्या मालिकेत १९४ एकदिवसीय आणि ७० टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांध्ये संघाचे नेतृत्व केलेल्या खेळाडूंमध्ये पॉटिंग आणि धोनी यांच्यानंतर न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगचा क्रमांक आहे. त्याने ३०३ मॅचमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (२८६), ऑस्ट्रेलियाचा एलन बोर्डर (२७१), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (२४९), भारताचा मोहम्मद अझरुद्दीन (२२१), सौरव गांगुली (१९६) यांचा क्रमांक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement