CWG 2022 Day 3 Live Updates: क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स
CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs PAK) भिडणार आहे.
LIVE
Background
CWG 2022 Day 3 Schedule: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs PAK) भिडणार आहे. हा सामना आजच्या दिवसाचे खास आकर्षण असेल. 2018 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान अखेरचे आमने सामने आले होते. हा सामना एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघ घानाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. बर्मिंगहॅम विद्यापीठ आणि स्क्वॅश सेंटरमध्ये हा सामना खेळवला जाईल. भारतीय युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपलं नशीब आजमवणार आहे. जेरेमी लालरिनुंगा हा वेटलिफ्टर इव्हेंटद्वारे कॉमनवेल्थ स्पर्धेत पदार्पण करणार आहे. पुरुषांच्या सांघिक उपांत्यपूर्व फेरीत भारतीय टेबल टेनिसपटूचांही खेळ होणार आहे. त्यामुळं वैयक्तिक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष खेळाडूही आज आपली पात्रता सिद्ध करतील. जेरेमी लालरिनुंगासह अन्य तीन भारतीय वेटलिफ्टर्स भारताच्या पदकतालिकेत वाढ करण्याचा प्रयत्न करतील. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन निखत जरीनही बर्मिंगहॅममध्ये महिलांच्या लाईट फ्लायवेट प्रकारात रिंगमध्ये दिसणार आहे.
भारतीय महिला टेबल टेनिस संघाचं आव्हान संपुष्टात
कॉमनवेल्थ स्पर्धेत 2022 महिला टेबल टेनिस संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारतीय महिला हॉकी टीमला दुसरा विजय मिळाला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी चढउतार असणारा ठरला. भारताने वेटलिफ्टिंगमध्ये एक पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. भारतीय हॉकी संघाने दुसरा विजय मिळत चांगली स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. तर महिला टेबल टेनिस टीमला मात्र स्पर्धेत नशीब उजळता आलेलं नाही. भारतीय महिला टेबल टेनिस टीम स्पर्धेतून बाहेर पडली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील महिला टेबल टेनिस संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
भारतीय महिला हॉकी संघाचा सलग दुसरा विजय
कॉमनवेल्थ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ (India Women's Hockey Team) सातत्यानं दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात घानाला धुळ चाखल्यानंतर भारतीय महिला संघानं वॉल्सचाही पराभव केलाय. वॉल्सविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं 3-1 अशा फरकानं विजय मिळवलाय. भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा पुढचा सामना इंग्लंडशी (2 ऑगस्ट) खेळणार आहे.
नवज्योत कौरच्या गैरहजरीत भारताची धडाकेबाज कामगिरी
भारतीय महिला हॉकी संघाला शनिवारी मोठा धक्का बसला. स्टार मिडफिल्डर नवज्योत कौरचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं तिनं भारतात परतण्याचा निर्णय घेतलाय. कौर गेल्या दोन दिवसांपासून आयसोलेशनमध्ये होती आणि भारत विरुद्ध घाना सामन्यातही ती खेळली नव्हती.
हे देखील वाचा-
IND vs PAK, CWG 2022: भारताचा पाकिस्तानवर 8 विकेट्सनं विजय
Commonwealth Games 2022: भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 8 विकेट्सनं (India Beats Pakisthan) पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आले. पाकिस्तानला 18 षटकात 99 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारतानं 11.4 षटकात आणि 8 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं.
कॉमनवेल्थ बॉक्सिंग स्पर्धेत शिव छापाचा पराभव
शिव थापा यांना बॉक्सिंगमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर तो बाहेर पडला आहे. 63.5 किलो वजनी गटात स्कॉटलंडच्या रीस लिंचने त्याचा 1-4 असा पराभव केला.
IND vs PAK, CWG 2022: भारतीय महिला संघासमोर 100 धावांचे लक्ष्य
पाकिस्तानच्या महिला संघाने भारतीय महिला संघासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पावसामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला आहे. आता टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 108 चेंडूत 100 धावांची गरज आहे.
IND vs PAK, CWG 2022: भारतानं नाणेफेक गमावलं, पाकिस्तान प्रथम फलंदाजी करणार
IND vs PAK, CWG 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलंय. दोन्ही संघाला आपपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघाचं स्पर्धेतील आव्हान जिंवत राहील. तर, पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे.
CWG 2022 Day 3 Live Updates: पावसामुळं भारत-पाकिस्तान यांच्यातील नाणेफेकला विलंब
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आज आमने- सामने येणार आहेत. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळं नाणेफेकला विलंब झालाय.