एक्स्प्लोर

Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026 : 34 षटकार, 39 चौकार अन् 499 धावा.... भारताविरुद्ध हाय-व्होल्टेज सामन्यानंतर हॅरी ब्रूकने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Harry Brook Statement After Lose vs India : 34 षटकार, 39 चौकार आणि तब्बल 499 धावांचा पाऊस पडला. मात्र, या तुफानी धावांच्या खेळात इंग्लंडचे स्वप्न भंगलं आणि भारताने फायनलमध्ये धडक मारली.

Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना... मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज जे घडलं, ते क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. 34 षटकार, 39 चौकार आणि तब्बल 499 धावांचा पाऊस पडला. मात्र, या तुफानी धावांच्या खेळात इंग्लंडचे स्वप्न भंगलं आणि भारताने फायनलमध्ये धडक मारली. भारताकडून 7 धावांनी पराभव झाल्यानंतर यजमान संघाच्या डावात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने कबूल केले की त्याने संजू सॅमसनला बाद करून मोठी चूक केली होती, ज्याने नंतर अर्धशतक झळकावले आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, आम्हाला वाटलं होतं की ताजी खेळपट्टी असल्यामुळे सुरुवातीला चेंडू थोडा थांबेल आणि पहिल्या डावात फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळेल. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. भारताने फलंदाजी करताना अप्रतिम खेळ केला. आजच्या सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत आमच्या सर्व खेळाडूंनी ज्या पद्धतीने खेळ केला, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

कुठे झाली मोठी चूक?

हॅरी ब्रूक म्हणाला की, मी प्रामाणिकपणे कबूल करतो की संजू सॅमसनचा कॅच सोडणं ही माझी मोठी चूक होती. क्रिकेटमध्ये एक जुनी म्हण आहे, कॅच पकडा आणि मॅच जिंका (Catches win matches), आणि आज मैदानात गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत. शेवटी त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली.

पुढे तो म्हणाला, गोलंदाजीतही काही ठिकाणी आम्ही फसलो. आम्ही जसं करायला हवं होतं तसं पूर्णपणे करू शकलो नाही. भारताचे फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहेत आणि त्यांच्या विरोधात जर थोडीही चूक झाली, तर चेंडू थेट सीमारेषेबाहेर जातो. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही अपेक्षेप्रमाणे अंमलबजावणी करू शकलो नाही. तरीही आम्ही पूर्ण ताकदीने लढलो, पण दुर्दैवाने निकाल आमच्या विरोधात गेला.

जेकब बेथेलबद्दल काय म्हणाला हॅरी ब्रूक?

जेकब बेथेलबद्दल बोलायचं झालं तर तो आज अप्रतिम खेळला. भविष्यात तो आपल्या कारकिर्दीत खूप नाव आणि पैसा कमावेल, याबद्दल मला खात्री आहे. त्याने आज जगाला दाखवून दिलं की तो किती मोठा खेळाडू बनू शकतो. जरी निकाल आमच्या विरोधात गेला असला, तरी त्याची खेळी या स्पर्धेतील आमच्यासाठी मोठी सकारात्मक गोष्ट आहे. पहिल्याच चेंडूपासून त्याने आक्रमक खेळ करत सगळ्यांना आपली क्षमता दाखवून दिली, तो क्षण खरोखर खास होता.

शेवटी तो म्हणाला, एकंदरीत पाहिलं तर आम्ही चांगली स्पर्धा खेळलो. मी आधीही सांगितलं होतं की आम्ही कधीही सामना सोडत नाही, आणि आज पुन्हा ते सिद्ध झालं. 250 धावांचा पाठलाग करताना इतर काही संघ कोसळले असते, पण आम्ही शेवटपर्यंत लढत राहिलो. आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आज निकाल आमच्या बाजूने लागला नाही.

हे ही वाचा -

Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026 Suryakumar Yadav: 89 धावा करणारा संजू सॅमसन नव्हे...; इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारने कुणाला दिले विजयाचे श्रेय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget