एक्स्प्लोर

CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा 37 धावांनी विजय; चेन्नईचा 5 वा पराभव, विराट कोहली ठरला हिरो

IPL 2020 CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील 25 वा सामना शारजामध्ये खेळला गेला. बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 169 धावा केल्या. चेन्नईला 170 धावांचे लक्ष्य मिळाले जे चेन्नईला पूर्ण करता आले नाही. बंगळुरूने हा सामना 37 धावांनी जिंकला.

IPL 2020 CSK vs RCB : आयपीएल 2020 स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा आज पाचवा पराभव झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईचा 37 धावांनी पराभव केला. आजचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो विराट कोहली. शारजाच्या मैदानात विराटने आज चौफेर फटकेबाजी केली. बंगळुरूने दिलेलं 170 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला 132 धावांपर्यंतचं मजल मारता आली.

चेन्नई संघाची सुरुवात आज अडखळत झाली. तुफान फॉर्मात असलेला शेन वॉटसन आज अपयशी ठरला. सलामीची जोडी स्वस्तात परतल्यानंतर अंबाती रायडूने खऱ्या अर्थाने चेन्नईचा डाव सावरला. त्याला नारायण जगदीसनने चांगली साथ दिली. रायडूने 40 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 42 धावा काढल्या. तर नारायणने 28 चेंडूत 33 धावा जमवल्या. मात्र, या दोघांच्या व्यतिरिक्त कोणालाही चांगली खेळी करता आली नाही. कर्णधार धोनी देखील अवघ्या 10 धावांवर तंबूत परतला. चेन्नईने 20 षटकांमध्ये आठ गडी गमावत 132 धावांपर्यंत मजल मारली. बंगळुरुच्या बॉलर्सने आज टिच्चून गोलंदाजांनी केली. ख्रिस मॉरिसचं तर विशेष कौतुक करायला हवं. त्याने अवघ्या 19 धावा देत 3 गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनेही 2 माघारी धाडले तर ईसुरु उदाना आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

KXIP vs KKR : पंजाबने विजयी सामना गमावल्यानंतर युवराजसिंगसह दिग्गजांच्या प्रतिक्रिया, म्हणाले..

चेन्नईविरूद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आज त्याच्या मुळ रुपात दिसला. विराटने आज कर्णधार पदाला साजेशी खेळी केल्याने बंगळुरूने 20 षटकात 4 बाद 169 धावा काढल्या. दरम्यान, बँगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराटने आज धमाकेदार नाबाद 90 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर आरोन फिंच 2 धावांवर त्रिफळाचीत झाला. मात्र, त्यानंतर देवदत्त पडीकल आणि विराटने डाव सावरला. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. पडीकल 33 धावांवर माघारी गेल्यावर पाठोपाठ एबी डीव्हिलियर्सही शून्यावर बाद झाला. पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदर केवळ 10 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शिवम दुबे या जोडी डाव संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला. विराटने आपल्या IPL कारकिर्दीतील 38 वे अर्धशतक ठोकलं. त्याने 52 चेंडूत नाबाद 90 धावा कुटल्या. त्यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेनेही त्याला साथ देत 14 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार खेचला. या दोघांच्या नाबाद 76 धावांच्या भागीदारीच्या बळावरच बंगळुरूने 4 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर दीपक चहर आणि सॅम कुर्रान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

महेंद्रसिंह धोनीच्या परिवारासंदर्भात अभद्र ट्रोलिंग, क्रिकेटर्ससह अनेकांचा संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Embed widget