KXIP vs KKR : पंजाबने विजयी सामना गमावल्यानंतर युवराजसिंगसह दिग्गजांच्या प्रतिक्रिया, म्हणाले..
कोलकाताविरुद्धच्या अतिशय रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने विजयी सामना गमावला. पंजाबच्या या पराभवामुळे केवळ चाहत्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं नाही. तर अनेक दिग्गजांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
KXIP vs KKR : आयपीएल 2020 च्या 24 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 2 धावांनी पराभव केला. या मोसमातील पंजाबचा हा सहावा पराभव आहे. एकावेळी असे वाटत होते की पंजाब हा सामना सहज जिंकू शकेल. परंतु, शेवटच्या चार षटकांत हातात आलेला सामना गमावला. अशाप्रकारे पंजाबला सलग पाचवा पराभव पत्करावा लागला.
शेवटच्या बॉलवर असं वाटतं होतं की हा सामना टाय होईल आणि या मॅचचा निकाल सुपर ओव्हरमधून येईल. मात्र, कोलकाताच्या संघाने हा सामना काही मिलिमीटरने जिंकला. खरं तर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पंजाबला 7 धावांची आवश्यकता असताना मॅक्सवेलने नरेनविरुद्ध षटकार खेचला, पण चेंडू चौकारापूर्वी काही मिलिमीटर पडला आणि पंजाबला एक चौकार मिळाला. जर तो सिक्स ठरला असता तर सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी सुपर ओव्हर खेळली गेली असती.
A Bees .... away #KKRvsKXIP pic.twitter.com/AWqG7GByf6
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) October 10, 2020
अशा प्रकारे रोमांचक सामन्यात पंजाबचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांसह क्रिकेट दिग्गजांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी याला पंजाबचे दुर्दैव म्हटले.
Wow! I don't have words for what I have just witnessed. Brilliant captaincy from @DineshKarthik and what a comeback by @KKRiders ! "Never say die" should be the theme of this IPL! @lionsdenkxip need some serious strategy rejig! #KKRvsKXIP #IPLinUAE
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) October 10, 2020
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगनेही पंजाबच्या पराभवाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला की हा एक अविश्वसनीय निकाल आहे. जर आपल्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली असेल तर हा सामना लवकर जिंकायला हवा होता. पंजाबचे दुर्दैव. दिनेश कार्तिक हा गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले.
That was a unbelievable result for @KKRiders ! U cannot take the game so deep if your openers are set ! Puts too much pressure on the middle order with no time to settle ! Bad luck @lionsdenkxip #ipl2020 well played @RealShubmanGill @mayankcricket !@DineshKarthik game changer!
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 10, 2020
One inch... and the game would have gone to super over #IPLinUAE
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 10, 2020