Round-robin Format : राउंड रॉबिन पद्धतीने होणार यंदाचा विश्वचषक, जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल संपूर्ण माहिती
Round-robin Format : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली.
ODI World Cup 2023, Round-robin Format : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने दहा संघामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला 9 सामने खेळावे लागणार आहेत. वनडे क्रिकेट विश्वचषकात तिसऱ्यांदा राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा होत आहे. याआधी 2019 आणि 1992 मध्ये राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने विश्वचषक स्पर्धा झाली होती. 2019 मध्ये इंग्लंडने तर 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक उंचावला होता.
राउंड रॉबिन फॉर्मेट काय आहे ?
राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. राउंड रॉबिन पद्धत म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, बांगलादेश, अफगाणिस्तान अथवा इतर कोणताही कमकुवत संघ टॉप 4 मध्ये पोहचू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर नॉकआऊट पद्धतीने सामने होतील. पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळेल तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या संघासोबत खेळेल. त्यानंतर विजेत्या दोन संघामध्ये फायनलचा थरार रंगेल.
राउंड रॉबिन पद्धतीमध्ये भारताची कामगिरी कशी आहे ?
राउंड रॉबिन पद्धतीने झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाची कामिगिरी निराशाजनक आहे. 1992 मध्ये पहिल्यांदा राउंड रॉबिन स्पर्धा रंगली होती, तेव्हा भारतीय संघाला टॉप 4 मध्ये स्थान पटकावता आले नव्हते. तर 2019 मध्ये भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. न्यूझीलंडने भारताचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. यंदा भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे, त्यामुळे टीम इंडिया कशी कामगिरी करतेय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सर्वाधिक आठ वेळा ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धतीने वर्ल्ड कप खेळवण्यात आला आहे.
कधी | फॉर्मेट |
1975 ते 1987 पर्यंत | ग्रुप स्टेज आणि नॉकआउट |
1992 | राउंड रॉबिन आणि नॉकआउट |
1996 | ग्रुप स्टेज आणि नॉकआउट |
1999 ते 2003 पर्यंत | ग्रुप स्टेज आणि सुपर सिक्स |
2007 ते 2015 पर्यंत | ग्रुप स्टेज आणि नॉकआउट |
2019 | राउंड रॉबिन आणि नॉकआउट |
दहा संघ कोणते ?
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे दहा संघ पात्र ठरले आहेत. क्वालिफायर सामन्यातून दोन संघ निवडले जाणार आहेत.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा -
8 ऑक्टोबर 2023 – भारत vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर 2023– भारत vs अफगाणिस्तान, दिल्ली
19 ऑक्टोबर 2023 – भारत vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर 2023 – भारत vs न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर 2023 – भारत vs इंग्लंड , लखनौ
2 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 2, मुंबई
5 नोव्हेंबर 2023 – भारत vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 1, बेंगलोर
आणखी वाचा :
World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार
ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका - वीरेंद्र सेहवाग