एक्स्प्लोर

Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला

Santosh Dhuri : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विभागध्यक्ष संतोष धुरी उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्यानं संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक 194  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला आहे. यामुळं नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी काही वेळापूर्वी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता उद्या संतोष धुरी भाजप प्रवेश करणार आहेत. ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला आहे. 

प्रभाग क्रमांक 194 मधून संतोष धुरी इच्छुक होते. मात्र, 194 वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला, या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळं संतोष धुरी नाराज झाले होते. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी संतोष धुरी यांच्या नाराजीचा फायदा घेत त्यांना भाजपकडे आणण्यात यश मिळवलं आहे. नितेश राणे यांनी संतोष धुरी यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणत ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला आहे. 

संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार

मनसेत नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष धुरी यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून भाजपनं मनसेला मोठा धक्का दिला आहे. वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यासाठी संतोष धुरी इच्छुक होते. मात्र, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली. ठाकरेंच्या शिवसेनेनं निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. इथं त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर रिंगणात आहेत.   

संतोष धुरी कोण आहेत?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संतोष धुरी हे संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांच्याकडे वरळीचं विभागध्यक्ष हे पद होतं.  संतोष धुरी हे मनसेमधून इच्छुक उमेदवार होते. पण 194 वार्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने धुरी यांना उमेदवारी पासून डावलले होते. आज त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित संतोष धुरी यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. उद्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करतील. 

दरम्यान, भाजप आणि शिवसेना युती करत मुंबईत महापालिका निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेचं आव्हान आहे. काँग्रेस देखील स्वतंत्र रिंगणात आहेत.  भाजप 135 जागा लढतेय तर शिवसेना 90 जागा लढतेय.  

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Nagpur MLC Election: नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या विरोधातील याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश; याचिकेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना,कोर्टात नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीपूर्वीच वाद थेट कोर्ट कचेरीत पोहचला; याचिकेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना; तर निवडणूक आयोगसह राज्य निवडणूक यंत्रणेलाही निर्देश
Nagpur MLC Election Result 2026: 'पहिल्या फेरीत माझी 40 ते 45 हजार मतांची घोडदौड, नितेश कराळे गुरुजींचा विश्वास; विजयामागचं राज'कारण'ही सांगितलं!
'पहिल्या फेरीत माझी 40 ते 45 हजार मतांची घोडदौड, नितेश कराळे गुरुजींचा विश्वास; विजयामागचं राज'कारण'ही सांगितलं!
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतककऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतककऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Ram Purnekar and Eknath shinde: साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
Embed widget