World Cup 2023 : विश्वचषकाचे 10 सामने महाराष्ट्रात, भारताचे दोन सामने मुंबई-पुण्यात होणार, पाहा सविस्तर माहिती
World Cup Schedule :मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम आणि पुण्यातील गुहंजे येथील स्टेडिअवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.
World Cup Schedule Mumbai Pune : वनडे विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आज आयसीसीने भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केलेय. ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थरराला सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. दहा मैदानावर भारतात होणाऱ्या विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मैदानांचा समावेश आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम आणि पुण्यातील गुहंजे येथील स्टेडिअवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. या दोन स्टेडिअवर दहा सामने होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअवर उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.
भारताचे महाराष्टात किती सामने होणार ?
मुंबई आणि पुण्यातील मैदानावर दहा सामने होणार आहेत. यामध्ये 9 सामने साखळी फेरीतील आहेत तर एक सामना उपांत्य फेरीचा आहे. महाराष्ट्रात भारताचे दोन साखळी सामने होणार आहेत. पुणे येथे 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरोधात तर मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर Qualifier 2 सोबत टीम इंडियाचा सामना होणार आहे. भारत जर उपांत्य फेरीत (Semifinal 1) गेला तर मुंबईत सामना होण्याची शक्यता आहे.
Pune पुणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान "गुहंजे"
19 ऑक्टोबर – भारत vs बांगलादेश
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान vs Qualifier 2
1 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका
8 नोव्हेंबर – इंग्लंड vs Qualifier 1
12 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश (Day Game)
Mumbai वानखेडे स्टेडिअम -
21 ऑक्टोबर – इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
24 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका vs बांगलादेश
2 नोव्हेंबर – भारत vs Qualifier 2
7 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs अफगाणिस्तान
15 नोव्हेंबर – Semifinal 1
अहमदाबादमध्ये सुरुवात आणि शेवट
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी होणारा फायनल सामनाही अहमदाबाद येथील स्टेडिअवर होणार आहे. मुंबई आणि कोलकाता येथील मैदानावर सेमी फायनलचा थरार रंगणार आहे. भारत जर सेमीफायनलमध्ये पोहचला तर मुंबईमध्ये सामना होणार आहे.
12 मैदानावर रंगणार विश्वचषकाचा थरार -
भारतामधील 12 मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर खेळवण्यात येणार आहे. सेमीफायनलचे सामने कोलकाता आणि मुंबईच्या मैदानावर होणार आहेत. अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे सराव सामने खेळवले जाणार आहेत.
आणखी वाचा :
World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार