Team India World Cup Schedule : भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक
Team India Schedule : यंदाची विश्वचषक स्पर्धा दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे 9 सामने असे एकूण 45 लीग सामने होणार आहेत.
ICC Mens Cricket World Cup 2023 Team India Schedule : भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या वेळापत्राकाची घोषणा झाली आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे 9 सामने असे एकूण 45 लीग सामने होणार आहेत. सहा सामने फक्त सकाळी साडे दहा वाजता सुरु होणार आहेत. उर्वरित सर्व सामने दुपारी सुरु होतील. विश्वचषकाचा उद्घाटनाचा सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर, अंतिम सामना देखील याच मैदानावर 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. तर अखेरचा सामना बेंगलोर येथे होणार आहे. भारतीय संघाचे नऊ सामने नऊ ठिकाणी होणार आहेत. चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, धर्मशाला, लखनौ, मुंबई, कोलाकाता आणि बेंगलोर या ठिकाणी भारताचे सामने रंगणार आहेत.
भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा -
8 ऑक्टोबर 2023 – भारत vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर 2023– भारत vs अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर 2023 – भारत vs पाकिस्तान, नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद
19 ऑक्टोबर 2023 – भारत vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर 2023 – भारत vs न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर 2023 – भारत vs इंग्लंड , लखनौ
2 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 2, मुंबई
5 नोव्हेंबर 2023 – भारत vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 1, बेंगलोर
8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना -
भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानात सामना रंगणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना असेल.
15 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान यांच्यात थरार -
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा थरार रंगणार आहे. या सामन्याला एक लाख प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानने अहमदाबाद येथे सामना खेळण्यास नकार दिला होता, पण आयसीसीने आणि बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिलाय.
🇮🇳 v 🇵🇰
— ICC (@ICC) June 27, 2023
Date and venue for the highly-anticipated clash between India and Pakistan at the ICC Men's Cricket World Cup 2023 👇#CWC23 https://t.co/TZlm0sZBwP
आणखी वाचा :
World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार